Gold Rate : या वर्षापर्यंत सोन्याचे भाव पोहोचणार 15 लाखांवर, नव्या अंदाजानं उडाली झोप

Gold Rate : या वर्षापर्यंत सोन्याचे भाव पोहोचणार 15 लाखांवर, नव्या अंदाजानं उडाली झोप
Gold Rate : या वर्षापर्यंत सोन्याचे भाव पोहोचणार 15 लाखांवर, नव्या अंदाजानं उडाली झोप


जगातील दोन बलाढ्य देश अमेरिका आणि चीन सध्या आमने-सामने आहेत. एकीकडे अमेरिका सध्या जागतिक व्यासपीठांवरून काढता पाय घेत असल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चीन मात्र आपली पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. जगामध्ये सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्याचा परिणाम हा केवळ जागतिक राजकारणावरच होणार नाहीये, तर त्याचा परिणाम हा तुमच्या खिशावर देखील पडणार आहे. सध्या जगात ज्या घडामोडी घडत आहेत, ते पहाता अनेकांना असा देखील प्रश्न पडला आहे की, 2050 मध्ये सोन्या -चांदीचे दर काय असतील? गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेनं अनेक संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संस्थांमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे चीन मात्र नव्यानं या संस्थांशी जोडला जात आहे, हा एक मोठा उलटफेर पहायला मिळत आहे.

जेव्हा -जेव्हा जागतिक पातळीवर अनिश्चिततेचं वातावरण निर्माण होतं, तेव्हा -तेव्हा सोन्यात केलेली गुंतवणूक ही अधिक फायदेशीर मानली जाते. महागाई, युद्ध, आर्थिक मंदी, मुद्रा संकट अशी संकट जेव्हा जगावर येतात, तेव्हा सोन्याच्या किंमतीने उसळी घेतल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळेच जगात सध्या सुरू असलेल्या घडामोडी पहाता जगातील बलाढ्य देश असलेले चीन, भारत, रशिया यासारखे देश सातत्याने आपल्याकडचा सोन्याचा साठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या डॉलरला मोठा हादरा बसला असून डॉलर देखील कमकुवत होण्याच्या मार्गावर आहे.

सध्या सोन्यामधील गुंतवणूक प्रचंड प्रमाणात वाढत आहे, सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये आता पाहूयात की 2050 मध्ये सोन्याचे प्रति तोळा तसेच चांदीचे प्रति किलो दर नक्की किती असतील? एका अंदाजानुसार 24 कॅरेट सोन्याचे दर 2050 साली प्रति तोळा 14 ते 15 लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. तर काही अंदाज असे देखील वर्तवण्यात आले आहेत की, सोन्याचे दर 2050 पर्यंत प्रति तोळा 40 लाखांपर्यंत देखील पोहोचू शकतात. तर दुसरीकडे 2050 पर्यंत चांदीचे दर हे प्रति किलो 3 ते 5 कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे, सोन्या -चांदीमध्ये होणारी मोठी गुंतवणूक हे त्यामागचं एक प्रमुख कारण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *