Middle East Tension : इराणला पहिला धोका देणारा मुस्लिम देशच असेल, त्यांनी गुपचूप आपल्याइथे..सॅटलाइट फोटोंमधून मोठा खुलासा

Middle East Tension : इराणला पहिला धोका देणारा मुस्लिम देशच असेल, त्यांनी गुपचूप आपल्याइथे..सॅटलाइट फोटोंमधून मोठा खुलासा
Middle East Tension : इराणला पहिला धोका देणारा मुस्लिम देशच असेल, त्यांनी गुपचूप आपल्याइथे..सॅटलाइट फोटोंमधून मोठा खुलासा


सध्या मध्य पूर्वेमध्ये मोठा तणाव आहे. इराण-अमेरिकेमध्ये कुठल्याही क्षणी युद्ध सुरु होईल अशी स्थिती आहे. अमेरिकेने आपल्या युद्धानौका इराण जवळच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. सध्या दोन्ही देशांकडून धमकी सत्र सुरु आहे. हे युद्धा टाळण्यासाठी पश्चिम आशियातील काही मुस्लिम देश प्रयत्नशील आहेत. इराण आणि अमेरिकेत शांतता करार घडवून आणण्यासाठी ओमानमध्ये चर्चा सुरु आहे. मात्र, त्याचवेळी युद्धाला तोंड फुटलं तर इराणसोबत दगाफटका करणारा पहिला मुस्लिम देशच असेल. एक सॅटलाइट फोटोमुळे मिडिल ईस्टमध्ये खळबळ उडाली आहे. हा फोटो जॉर्डनचा आहे. सॅटलाइट फोटोत जॉर्डनच्या एअरबेसवर अमेरिकेचे 12 फायटर जेट 15 ई तैनात दिसतायत. जॉर्डनने आपला बेस इराण विरुद्ध वापरु देणार नाही अशी घोषणा केलेली असताना ही अमेरिकन फायटर जेट्स तिथे तैनात आहेत, हे विशेष.

इराण आणि अमेरिकेत ओमान येथे शांती चर्चा सुरु आहे. इराणला कुठल्याही दबावाशिवाय चर्चा करायची आहे. अमेरिकेने जॉर्डन मध्ये 12 फायटर जेट तैनात करुन इराणवरील दबाव आणखी वाढवला आहे. इराणने अटी मान्य केल्या नाहीत, तर त्यांच्यावर हल्ला अटळ आहे, हे अमेरिकेने स्पष्ट संकेत दिले आहेत.

इस्रायलला वाचवण्यात महत्वाची भूमिका

हा हल्ला सर्वात आधी जॉर्डनच्या बाजूने होईल. जून 2025 मध्येही जॉर्डनने इस्रायलला वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. जॉर्डनने अधिकृतरित्या काहीही सांगू दे. पण या तणावाच्या काळात ते अमेरिकेसोबत आहेत, हे सॅटलाइट फोटोंमधून स्पष्ट झालय. इराणवर दबाव टाकण्याचा विषय असो किंवा हल्ल्याचा ते अमेरिकेला साथ देतायत हे स्पष्ट आहे.

F-15 E फायटर जेट्ची खासियत काय?

जॉर्डनने मुवफ्फाक साल्टी एअरफोर्स स्टेशनवर कमीत कमी एक डझन F-15 E फायटर जेट्स तैनात ठेवले आहेत. द सनने हे सॅटलाइट इमेज प्रसिद्ध केले. नुकतचं या विमानांना इथे तैनात केलय. F-15 E हवेतून हवेत लढाई करण्यास सक्षम असलेलं लढाऊ विमान आहे. हे फायटर जेट रात्र आणि दिवस दोन्ही वेळ युद्ध करण्यास सक्षम आहे. या फायटर जेटद्वारे लांब पल्ल्याची ऑपरेशन्स सुद्धा केली जाऊ शकतात. जॉर्डनवरुन तेहरानमध्ये घुसण्यासाठी इराकमार्गे जावं लागतं. हा खूप लांबचा रुट आहे. म्हणून अमेरिकेने साल्टी एअरफोर्स स्टेशनवर F-15 E फायटर जेट्स तैनात केले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *