भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा दुर्दैवी अंत, जंगलामध्ये आढळला मृतावस्थेत

भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा दुर्दैवी अंत, जंगलामध्ये आढळला मृतावस्थेत
भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा दुर्दैवी अंत, जंगलामध्ये आढळला मृतावस्थेत


भाईंदर मध्ये एका इमारतीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा ठाण्याचा येऊर जंगलामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या 3 वर्षीय नर बिबट्याने भाईंदर परिसरात नागरिकांवर हल्ला केला होता, त्याचा सोमवारी मृत्यू झाला आहे. बिबट्याचे मृत्यूचे कारण शोधण्यासाठी बोरिवली वन विभागाकडून फॉरेन्सिक लॅबला बिबट्याच्या शरिराचा भाग पाठवण्यात आला आहे. लॅबचा अहवाल आल्यानंतर या बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

वन विभागाने बिबट्या पकडला तेव्हा तो फिट होता

भाईंदर परिसरात लोकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला भाईंदर परिसरातून वन विभागाकडून डिसेंबर महिन्यामध्ये बिबट्या ला रेस्क्यू करून बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आणण्यात आला होता. यानंतर वन विभागाकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, यात तो फिट असल्याचे समर आले होते. त्यामुळे वन मंत्री गणेश नाईक यांच्या आदेशाने वन विभागाकडून सॅटेलाइट कॉलर लावून पुन्हा बिबट्याला ठाणे येऊर च्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते.

बिबट्या मृतावस्थेत आढळला

दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस बिबट्याचा जंगलामध्ये नॅचरल मुव्हमेंट होता, वन विभागाकडून एक टीम बनून त्या बिबट्यावर नजर ठेवली जात होती. दोन तारखेला बिबट्याचा मोमेंट एका ठिकाणी जंगलात मध्ये दिसल्यामुळे आणि बिबट्याच्या सॅटेलाइट कॉलर द्वारे बिबट्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे संदेश वन विभागाला मिळाला. यानंतर ठाणे च्या येऊर जंगलात वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.

फॉरेन्सिक लॅब चा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण समजणार

वन विभागाकडून बिबट्याचं पार्थिव घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन मध्ये सुद्धा बिबट्याच्या रिपोर्ट नॉर्मल आला आहे. बिबट्याचा मृत्यूचे कारण तपासण्यासाठी बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून त्याच्या बॉडीच्या पार्ट च्या सॅम्पल घेऊन फॉरेन्सिक लाभला पाठवले आहेत. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण कळेल असा दावा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वजण या अहवालाची वाट पाहत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *