Mukesh Ambani : याला म्हणतात अब्जाधीश, 300 सेकंदातच केली 2700 कोटींची रेकॉर्ड ब्रेक डील

Mukesh Ambani : याला म्हणतात अब्जाधीश, 300 सेकंदातच केली 2700 कोटींची रेकॉर्ड ब्रेक डील
Mukesh Ambani : याला म्हणतात अब्जाधीश, 300 सेकंदातच केली 2700 कोटींची रेकॉर्ड ब्रेक डील


आशियाचा सर्वात मोठे अब्जाधीश असलेले मुकेश अंबानी ( Mukesh Ambani ) यांनी अलिकडेच एका इव्हेंटमध्ये आपल्या यशाचे गुपित सांगितले आहे. त्यांनी जिओ संदर्भात खुलासा केला आहे. ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक आणि रिलायन्स दरम्यान एक मल्टी-मिलियन डॉलरची डील कशी झाली होती आणि त्यामुळे जिओ कसा ब्लॅक रॉक बनला, ही डील अवघ्या ५ मिनिटांच्या कार राईड दरम्यान झाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ ब्लॅकरॉकच्या ‘Investing for a New Era’ इव्हेंटमध्ये ब्लॅक रॉकच्या सीईओ दरम्यान झालेल्या या गप्पांमध्ये या घटनेला उजाळा दिला.

किती कोटींची डील झाली ?

मुकेश अंबानी म्हणाले की हा आमचा संवाद साल २०२३ रोजी झाला होता, आणि मला हे बोलण्यास पाच मिनिटे लागली., लॅरी, ब्लॅकरॉकला भारतात यायला हवे,’ आणि ते म्हणाले की तुम्ही माझ्याशी पार्टनरशीप कराल का ? यामुळे आमच्या एक $ ३०० मिलियन (२७१७ करोड़ रुपये) एक जॉईंट वेंचर झाला,ज्यात जिओ फायनान्शियल सर्व्हीसेज आणि ब्लॅकरॉक बरोबरीचे पार्टनर आहेत.

सर्वात मोठे एसेट मॅनेजर

ब्लॅकरॉक,ही जगातील सर्वात मोठी एसेट मॅनेजर कंपनी आहे. तिचे सीईओ आहेत ७३ वर्षीय लॅरी फिंक. ब्लॅकरॉक डिसेंबर २०२५ च्या अखेर $14 ट्रिलियनचे इन्वेस्टमेंट मॅनेज करत आहे. लॅरी फिंकच्या मते आम्ही पॉईंट ए ते पॉईंट बी पर्यंत जावे लागेल. आम्ही त्या कार राईडमध्ये हे काम (डील )पूर्ण केले.’जाणकारांच्या मते डील मेकींगचा हा वेग दोन्ही अब्जोपतींच्या दरम्यानच्या गहीऱ्या नात्याशिवाय भारताच्या फायनान्शिय सर्व्हीसेस इंडस्ट्रीजमध्ये उपस्थित संधीला देखील दर्शवत आहे.

मुकेश अंबानी यांची नेटवर्थ

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असून हा उद्योग मीडीया, रिटेल, फायनान्शियल सर्व्हीसेस, तेल आणि गॅस, टेलिकॉम आणि पेट्रोकेमिकल्स सह अनेक सेक्टरमध्ये पसरला असून ही कंपनीचे बाजार मूल्य १२५ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सच्या नुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती १०३.८ अब्ज डॉलर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *