रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत

रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत


बिल्डर सुशील रहेजा यांच्या चेंबूर येथील कार्यालयाची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. एका कर्मचाऱ्याला अपमानजनक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सुशील रहेजा यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होऊनही रहेजाला अटक न झाल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

या घटनेनंतर, शिवाजीनगर पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या सागर गवई, आनंद घाडगे, रोशन आठवले यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून, चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबई वंचित महिला अध्यक्ष स्नेहल सोहनी यांचाही समावेश आहे. या कार्यकर्त्यांना आज शिंदेवाडी-भोईवाडा येथील सुट्टीच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

वंचित बहुजन आघाडीने पोलिसांवर दुहेरी भूमिकेचा आरोप केला आहे. कार्यकर्त्यांना अटक करण्यात दाखवलेली तत्परता बिल्डरला अटक करण्याबाबत का दाखवली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत बिल्डरला अटक होत नाही, तोपर्यंत शांत न बसण्याचा इशाराही वंचितने दिला आहे. त्यांनी रहेजाला मुंबईच्या रस्त्यावर फिरू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *