श्वानाला दुसऱ्या ठिकाणी हलवल्याने प्राणीप्रेमीने जे केलं, ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

श्वानाला दुसऱ्या ठिकाणी हलवल्याने प्राणीप्रेमीने जे केलं, ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
श्वानाला दुसऱ्या ठिकाणी हलवल्याने प्राणीप्रेमीने जे केलं, ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का!


पिंपरी चिंचवड येथील रावेत परिसरातील एका वसाहती जवळील कुत्रा दुसऱ्या ठिकाणी हलवल्याने एका प्राणीप्रेमी व्यक्तीचा संताप टोकाला पोहोचला… संतापलेल्या व्यक्तीने वसाहतीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली… ज्या व्यक्तीने मारहाण केली आहे, त्या व्यक्तीचं नाव नितेश खरे असं आहे… रावेतच्या सोनीगरा सीतांगण या वसाहतीच्या समोर एक भटका श्वान राहत होता. या श्वानामुळे वाद टोकाला पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, वसाहतीत राहणाऱ्या भटक्या श्वानाला तेथील काही प्राणीप्रेणी खायला घालायचे. पण ह श्वान अपरात्री भुंकत होता त्याचबरोबर गाड्यांच्या मागे धावत होता त्यामुळे वसाहतीतील काही जणांनी या श्वालनाला दुसऱ्या ठिकाणी हलवले….

श्वानाला दुसऱ्या ठिकाणी ठेवल्यामुळे नितेश खरे याला एवढा राग आला की वसाहतीत जो कर्मचारी काम करत होता आणि ज्याने श्वान दुसरीकडे सोडला त्याला अत्यंत निर्दयीपणे कानाखाली मारल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला. श्वानामुळे मारहाण केल्याच्या कारणामुळे नितेश खरे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

श्वानासंदर्भात काही तक्रार, काही चर्चा करायची होती तर ती सोसायटीच्या रहिवाशांची करायला हवी होती, कर्मचाऱ्याला मारण्याची गरज नव्हती अशी भूमिका वसाहतीच्या रहिवाशांनी घेतली. यावर नितेश खरे यांनी स्पष्टीकर दिल आहे. ‘मी केलेली मारहाण जाणीवपूर्वक नव्हती. तो संतापाच्या भरात घडलेला प्रकार होता असं स्पष्टीकरण दिलंय.

त्याचवेळी मार खाणाऱ्या व्यक्तीने दोन महिन्यापूर्वी एका कुत्र्याला काठीने बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याचा आरोप खरे याने केले आहेत. दुसरीकडे पशु प्रेमींना जेव्हा मारहाण केली जाते त्यांना पशुंना खाण्यापासून अडवले जाते तेव्हा मानवता कुठे जाते असा सवाल देखील नितेश खरे याने उपस्थित केलाय..

दुसरीकडे या प्रकरणाची कोणतीही तक्रार आली नसल्याने यावर कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. प्राण्यांवर अत्याचार करू नये हे जरी खरं असलं तरी काही वेळा प्राण्यांमुळे होणाऱ्या अडचणी पशुप्रेमींनीही समजून घ्यावी त्यासाठी मारहाणी सारखे पावलं उचलणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *