NZ vs AFG : अखेर 2 वर्षांनी हिशोब झालाच, न्यूझीलंडकडून परतफेड, अफगाणिस्तानवर 5 विकेट्सने मात

NZ vs AFG : अखेर 2 वर्षांनी हिशोब झालाच, न्यूझीलंडकडून परतफेड, अफगाणिस्तानवर 5 विकेट्सने मात
NZ vs AFG : अखेर 2 वर्षांनी हिशोब झालाच, न्यूझीलंडकडून परतफेड, अफगाणिस्तानवर 5 विकेट्सने मात


New Zealand vs Afghanistan Match T20i World Cup 2026Image Credit source: @ACBofficials X Account

न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंडने या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात केली. अफगाणिस्तानने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये न्यूझीलंडसमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 13 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 17.5 ओव्हरमध्ये विजयी धावा पूर्ण केल्या. न्यूझीलंडने या विजयासह अखेर 2 वर्षांची मोठी प्रतिक्षा संपवली. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा या विजयासह मोठा हिशोब केला.

अफगाणिस्तानने गेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला होता. अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर 7 जून 2024 रोजी झालेल्या सामन्यात 84 धावांनी मात केली होती. न्यूझीलंडला या पराभवाची गेल्या 2 वर्षभरापासून सल होती. अखेर न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा कार्यक्रम करत हिशोब केला.

सामन्यात काय झालं?

अफगाणिस्तानने टॉस जिंकला.कॅप्टन राशिद खान याने बॅटिंगचा निर्णय घेतला. राशिदचा बॅटिंगचा निर्णय सहकाऱ्यांनी योग्य ठरवला. अफगाणिस्तानच्या 7 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. रहमानुल्लाह गुरुबाज, इब्राहीम झद्रान, गुलाबदीन नईब, सेदीकुल्लाह अटल, दार्विश रसूली, अझमतुल्लाह ओमरझई आणि मोहम्मद नबी या सर्वांनी दुहेरी आकडा गाठला. यापैकी काहींनी प्रमुख भूमिका बजावली. तर काहींनी छोटेखानी खेळी करत  योगदान दिलं.

अफगाणिस्तानसाठी गुलाबदीन नईब याने सर्वाधिक 63 धावा केल्या. सेदीकुल्लाह अटल याने 29 आणि रहमानुल्लाह गुरुबाजने 27 धावा जोडल्या. दारविश रसूली याने 20 धावा केल्या. तर इतर तिघांना 14 पार पोहचता आलं नाही. न्यूझीलंडसाठी लॉकी फर्ग्यूसन याने 2 विकेट्स मिळवल्या. तर मॅट हेन्री, जेकब डफी, मॅट हेनरी आणि रचीन रवींद्र या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

अफगाणिस्तानची कडक सुरुवात

त्यानंतर अफगाणिस्तानने विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं. मुजीब उर रहमान याने न्यूझीलंडच्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. मुजीबने फिन एलन याला 1 रनवर बोल्ड केलं. तर मुजीबने रचीन रवींद्र याला पहिल्याच बॉलवर बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

मात्र त्यानंतर न्यूझीलंड टीमच्या इतर 4 फलंदाजांनी निर्णायक खेळी करत संघाला सुरक्षित आणि सहज असा विजय मिळवून दिला. ओपनर टीम सायफर्ट याने सर्वाधिक 65 धावा केल्या. ग्लेन फिलिप्स याने 42 तर मार्च चॅपमन याने 28 धावा जोडल्या. तर डॅरेल मिचेल आणि मिचेल सँटनर या दोघांनी नाबाद राहत न्यूझीलंडला विजयी केलं. डॅरेलने 25 तर सँटनरने 17 धावा केल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *