रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबईपासून दिल्ली हादरली, DGCA ची टीम तात्काळ बारामतीत

रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबईपासून दिल्ली हादरली, DGCA ची टीम तात्काळ बारामतीत
रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबईपासून दिल्ली हादरली, DGCA ची टीम तात्काळ बारामतीत


अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचे निधन झाले होते. त्यानंतर काल आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच बारामती विमानतळाबाबत आणि विमान कंपनीच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळावरील सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानंतर आज DGCA ची टीम तात्काळ बारामतीत दाखल झाल्याचे पहायला मिळाले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

DGCA अधिकाऱ्यांकडून बारामती विमानतळाची पाहणी

बारामती विमानतळाची नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांची सविस्तर तपासणी करण्यात आली. विमानतळ सुरक्षित आहे का, याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अहवालावर अवलंबून राहणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पाहणीमुळे विमानतळाच्या सुरक्षा मानकांबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रोहित पवारांनी काय म्हटले होते?

रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, “शेवटच्या क्षणी काय घडले हे शोधून काढण्याची गरज आहे. ट्रान्सपॉन्डर का बंद करण्यात आला? धावपट्टी 11वर उतरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न का करण्यात आला? जर विमान धावपट्टी 29वर उतरले असते तर कदाचित इतका मोठा अपघात झाला नसता.”

3000 मीटर दृश्यमानतेवर विमान का उतरवले गेले?

विमानाच्या उतरवण्याच्या वेळी दृश्यमानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार यांनी विचारले, “जेव्हा विमान उतरवण्यासाठी डीजीसीएची मार्गदर्शक तत्त्वे 5000 मीटर दृश्यमानता आहे, तेव्हा विमान 3000 मीटर दृश्यमानतेवर का उतरवले गेले? कमी दृश्यमानता जाणूनबुजून योग्य होती का? अपघातात पायलट पाठकची चूक नव्हती का? पायलट कपूरबद्दल आमचे अनेक प्रश्न आहेत आणि आम्हाला उत्तरे हवी आहेत, आणि शक्य तितक्या लवकर.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *