Supriya Sule : दादा 28 तारखेला गेला, नाहीतर 30 जानेवारीला… रेवतीच्या लग्नाबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

Supriya Sule : दादा 28 तारखेला गेला, नाहीतर 30 जानेवारीला…  रेवतीच्या लग्नाबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
Supriya Sule : दादा 28 तारखेला गेला, नाहीतर 30 जानेवारीला…  रेवतीच्या लग्नाबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?


लेकीच्या लग्नाबद्दल काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी लौकरच लगीनघाई सुरू होणार आहे. त्यामागचं कारण म्हणजे सुप्रिया व सदानंद सुळे यांची कन्या रेवती हिचं ठरलेलं लग्न, दोनच दिवसांपूर्वी ही बातमी समोर आली आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे सारंग लखानी यांचं लग्न ठरल्याची बातमी, सुप्रिया सुळे यांची मैत्रीण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केली होती. त्यांनी हे जाहीर केलय्वार रेवती प्रकाशझोतात आली. त्यानतंर काल खुद्द सुप्रिया सुळे यांनीच रेवती व सारंग यांचे काही फोटो पोस्ट करत लग्न ठरल्याची गुड न्यूज अधिकृतरित्या शेअर केली. सारगं हे नागपूरचे असून ते प्रसिद्ध उद्योजक अरूण व वंदना लखानी यांचे सुपुत्र आहेत. त्यानंतर संपूर्ण कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला.

आज सकाळी सुप्रिया सुळे या माध्यमांशी संवाद साधत होत्या. रेवती व सारंग यांचं लग्न ठरल्याची घोषणा तुम्ही केली, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल काय सांगाल असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टच उत्तर दिलं.

अजित दादांच्या आशीर्वादाने ठरलं लग्न 

खरंतर अनेक महिने ही चर्चा चालू होती. रेवती आणि सारंग गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखतात. आणि माझं भाग्य आहे की मला सहा भाऊ आहेत, माझे सगळेच भाऊ, त्या सर्वांनी या नात्याला आशिर्वाद दिला. त्यामुळे मी हे माझं भाग्य समजते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं. खरंतर हे दुर्दैवं आहे की दादा ( अजित पवार) आपल्यातून 28 (जानेवारी) तारखेलाचा गेला, नाहीतर ही (लग्न ठरल्याची) घोषणा, सगळी फॅमिलीच 30 तारखेला करणार होती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे एकाच गोष्टीचं मला मनापासून समाधान वाटतंय की, दादाच्या आशिर्वादानेच हे लग्न ठरलं, असही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

कोण आहे सारंग लखानी ?

शरद पवार यांचे होणारे नातजावई, रेवती हिचा होणारा पती सारंग लखानी हा मूळचा नागपूरचा आहे. व्यवसायिक आणि उत्तम बॅडमिंटनपटू तथा विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत. सारंग स्वत:देखील उत्तम बॅडमिटंन खेळाडू असल्याचे समजते. तर रेवती सुळे यांच्या घरात राजकारणाचा मोठा वारसा असली तरी ती राजकारणापासून दूर असते. तिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून मास्टर्स केलं आहे. रेवती आणि सारंग याचं लग्न ठरल्याची गुड न्यूज जरी समोर आली असली तरी त्याचं लग्न कधी, मुहूर्त कधीचा याविषयी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *