Headlines

अखेर भारत-अमेरिका व्यापार कराराचं सर्वात मोठं सत्य समोर, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सगळं सांगून टाकलं; म्हणाले…

अखेर भारत-अमेरिका व्यापार कराराचं सर्वात मोठं सत्य समोर, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सगळं सांगून टाकलं; म्हणाले…
अखेर भारत-अमेरिका व्यापार कराराचं सर्वात मोठं सत्य समोर, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सगळं सांगून टाकलं; म्हणाले…


India America Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यात एक ऐतिहासिक असा अंतरिम करार झाला आहे. या कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापाराचा विस्तार होणार आहे. उर्जा, इंधन,खनीज, कृषी अशा वेगवेगळ्या पातळीवर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाढणार आहे. विरोधक मात्र या व्यापार करारामुळे भारताच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे, असा दावा केला आहे. सोबतच भारताने अमेरिकेच्या अटींवर हा करार केला आहे, असा आरोप केला आहे. असे असतानाच आता या ऐतिहासिक कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. कोळशाची निर्णयात आणि उर्जा क्षेत्राबाबत ते बोलते होते.

कोळशाच्या निर्यातीला अमेरिका चालना देणार

डोनाल्ड ट्रम्प चॅम्पियन ऑफ कोल या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भारतासोबतच्या व्यापार कराराचा उल्लेख केला. हा करार ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. सोबतच या करारामुळे अमेरिकेच्या कोळसा निर्यातीला चालना मिळेल. हा करार म्हणजे जागतिक उर्जा बाजारात अमेरिकेच्या वाढत्या ताकदीचे प्रतिक आहे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.

भारतासोबतच्या कराराचा केला उल्लेख

अमेरिका सध्या जगातील सर्वात मोठा आणि पहिल्या क्रमांकाचा उर्जा उत्पादक देश झाला आहे. उर्जेची मोठ्या प्रमाणात निर्यात करणारा देश म्हणून अमेरिका नावारुपाला येत आहे, असा दावाही त्यांनी केला. अमेरिकेने अलीकडच्या काळात भात, जपान, दक्षिण कोरिया यासारख्या महत्त्वाच्या देशांसोबत ऐतिहासिक व्यापार करार केले आहेत. अमेरिकेतील कोळशाची निर्यात वाढावी यासाठी हा करार करण्यात आला आहे, असेही यावेळी ट्रम्प यांनी सांगितले.

भारतासोबतचा करार हा उर्जा रणनीतीचाच भाग

यासह डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कोळशाची गुणवत्ता ही सर्वाधिक चांगली आहे. याच गुणवत्तेच्या आधारावर अमेरिका आंतरराष्ट्रीय बाजारात आपली जागा मजबूत करत आहे, असेही मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारतासोबत झालेला करार हा अमेरिकेच्या व्यापक उर्जा रणनीतीचाच एक भाग आहे, असेही सूचित केले आहे.

दरम्यान, अमेरिकेला उर्जा क्षेत्रात पुढे जायचे असेल आणि आगामी काळात अमेरिका भारतात कोळशाची निर्यात करत असेल तर त्याचा भारतावर सकारात्मक परिणाम पडणार की नकारात्मक हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *