IND vs NAM T20 WC Score Updates and Highlights : भारताने नामिबियावर 93 धावांनी मिळवला विजय, आता लक्ष्य पाकिस्तानचं

IND vs NAM T20 WC Score Updates and Highlights : भारताने नामिबियावर 93 धावांनी मिळवला विजय, आता लक्ष्य पाकिस्तानचं
IND vs NAM T20 WC Score Updates and Highlights : भारताने नामिबियावर 93 धावांनी मिळवला विजय, आता लक्ष्य पाकिस्तानचं


The liveblog has ended.

  • 12 Feb 2026 10:33 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : भारताने नामिबियाला 93 धावांनी नमवलं

    भारताने नामिबियाला 93 धावांनी पराभूत करत सुपर 8 फेरीच्या दिशेने कूच केली आहे. भारताने या सामन्यात नामिबियाला डोकंच वर काढू दिलं नाही. वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी नामिबियाचा कणाच मोडला. तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, हार्दिक पांड्या यांनीही विकेट काढल्या.  भारताचा पुढचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे.

  • 12 Feb 2026 10:25 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : नामिबियाला आठवा झटका, आता औपचारिकता बाकी, भारताचा विजय निश्चित

    टीम इंडियाने नामिबियाला आठवा झटका दिला आहे. यासह आता नामिबियाच्या पराभवाची फक्त औपचारिकता बाकी आहे.

  • 12 Feb 2026 10:01 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : नामिबियाला सहावा झटका, टीम इंडिया विजयाच्या दिशेने

    भारताचा उपकर्णधार अक्षर पटेल याने आपली दुसरी विकेट मिळवत नामिबियाला सहावा झटका दिला आहे. टीम इंडियाने यासह सलग दुसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

  • 12 Feb 2026 09:50 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : नामिबियाला अर्धा संघ तंबूत, अक्षर पटेलला पहिली विकेट

    टीम इंडियाच्या फिरकीपटूंचा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये कहर पाहायला मिळत आहे. वरुण चक्रवर्ती याने नामिबियाला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. त्यानंतर अक्षर पटेल याने 11 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर  नामिबियाचा कॅप्टन  गेरहार्ड इरास्मस याला तिवलक वर्मा याच्या हाती 18 रन्सवर कॅच आऊउट केलं.

  • 12 Feb 2026 09:46 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : नामिबियाला चौथा झटका, वरुणकडून एकाच ओव्हरमध्ये 2 झटके

    वरुण चक्रवर्ती याने कमाल केली आहे.  वरुणने नामिबिया विरुद्ध आपल्या कोट्यातील पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. त्यानंतर वरुणने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये डबल धमाका केला. वरुणने नामिबियाला 2 झटके दिले. वरुणने जॅन निकोल लॉफ्टी-ईटन आणि जेजे स्मित या दोघांना आऊट केलं.

  • 12 Feb 2026 09:37 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : मस्त रे, वरुणला पहिल्याच बॉलवर विकेट, नामिबियाला दुसरा झटका

    टीम इंडियाचा मिस्ट्रि स्पिनर वरुण चक्रवर्ती याने त्याच्या कोट्यातील पहिल्या आणि एकूण आठव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर नामिबियाला झटका दिला आहे. वरुणने लॉरेन स्टीनकॅम्प याला 29 रन्सवर बोल्ड केलं. 

  • 12 Feb 2026 09:16 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : विकेट गेली रे, नामिबियाला पहिला झटका, अर्शदीपने सेट जोडी फोडली

    वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने नामिबियाची सेट जोडी फोडून भारताच्या पहिल्या विकेटची प्रतिक्षा अखेर संपवली आहे. जॅन फ्रायलिंक 1आणि लॉरेन स्टींकॅम्प या सलामी जोडीने 33 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर अर्शदीपने नामिबियाला चौथ्या ओव्हरमध्ये पहिला झटका दिला. अर्शदीपने जॅन फ्रायलिंक याला 22 रन्सवर शिवम दुबे याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 12 Feb 2026 09:11 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : नामिबियाची आश्वासक सुरुवात

    जॅन फ्रायलिंक आणि लॉरेन स्टींकॅम्प या सलामी जोडीने नामिबियाला आश्वासक सुरुवात मिळवून दिली आहे. नामिबियाच्या सलामी जोडीने 3 ओव्हरमध्ये बिनबाद 23 रन्स केल्या आहेत. जॅन फ्रायलिंक 14 आणि लॉरेन स्टींकॅम्प 9 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 12 Feb 2026 08:56 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : नामिबियाकडून जॅन फ्रायलिंक आणि लॉरेन स्टींकॅम्प जोडी मैदानात

    नामिबियाकडून जॅन फ्रायलिंक आणि लॉरेन स्टींकॅम्प ही जोडी मैदानात आली आहे. तर हार्दिक पांड्या पहिलं षटक टाकण्यासाठी आलं आहे. पॉवर प्लेमध्ये नामिबिया किती धावा करते याकडे लक्ष लागून आहे.

  • 12 Feb 2026 08:43 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : भारताच्या 9 गडी गमवून 209 धावा

    भारताने शेवटच्या दोन षटकात फक्त 10 धावांवर पाच गडी गमावल्या. भारताची स्थिती 199 धावांवर 4 विकेट अशी होती. पण 20 षटकांचा खेळ संपला तेव्हा भारताने 9 गडी गमवून 209 धावा केल्या. भारताने नामिबियासमोर विजयासाठी 210 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय गोलंदाज किती धावांवर रोखतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 12 Feb 2026 08:39 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : रिंकु सिंहची फुसकी फलंदाजी

    रिंकु सिंहने फुसक्या फलंदाजीचं दर्शन घडवलं. डेथ ओव्हरमध्ये एका पाठोपाठ एक चार विकेट गमावल्या. रिंकु सिंहही काही खास करू शकला नाही. रिंकु सिंह 6 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला.

  • 12 Feb 2026 08:37 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : भारताने एका षटकात तीन गडी गमावले, धावगतीला ब्रेक

    टीम इंडियाने एका षटकात तीन विकेट गमावले आहेत. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे बाद झाले. तर अक्षर पटेल पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या धावगतीला धक्का बसला आहे.

  • 12 Feb 2026 08:35 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : टीम इंडियाला सहावा धक्का, हार्दिकनंतर शिवम बाद

    टीम इंडियाला शिवम दुबेच्या रूपाने सहावा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर शिवम दुबे धावचीत झाला. त्यामुळे डेथ ओव्हरमध्ये भारताच्या धावगतीला धक्का बसला.

  • 12 Feb 2026 08:32 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : हार्दिक पांड्याचं अर्धशतक

    हार्दिक पांड्याने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने 200 पार धावा केल्या आहेत. आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक असून किती धावा होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 12 Feb 2026 08:21 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : हार्ड हिटिंग पंड्या, ऑलराउंडर हार्दिकची स्फोटक बॅटिंग

    टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या शिवम दुबे याच्यासह टॉप गिअपरमध्ये बॅटिंग करत आहेत. टीम इंडियाने 16 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 184 धावा केल्या आहेत. हार्दिकने नाबाद 41 धावा केल्या आहेत. तर शिवम 14 धावांवर खेळत आहे.

  • 12 Feb 2026 08:08 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : भारताला झटपट 2 झटके, हार्दिक-शिवमवर जबाबदारी

    नामिबियाने टीम इंडियाला झटपट 2 झटके दिले. कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर तिलक वर्मा हे सेट फलंदाज बाद झाले. तिलक आऊट झाल्याने भारताने चौथी विकेट गमावली आहे. त्यामुळए आता हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या जोडीवर मोठी जबाबदारी आहे.

  • 12 Feb 2026 07:59 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : सूर्यानंतर तिलक वर्मा आऊट, भारताला चौथा धक्का

    नामिबियाने सूर्यकुमार यादव याच्यानंतर टीम इंडियाला आणखी एक झटका दिला आहे. नामिबियाने सेट तिलक वर्मा याला आऊट केलं आहे. तिलकने 21 बॉलमध्ये 25 रन्स केल्या.

  • 12 Feb 2026 07:55 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : भारताला तिसरा झटका, कर्णधार सूर्यकुमार यादव आऊट

    नामिबियाने टीम इंडियाला तिसरा झटका दिला आहे. विकेटकीपर झेन ग्रीन याने बर्नार्ड स्कोल्झ याने टाकलेल्या बॉलवर कॅप्टन सूर्यकुमार यादव याला स्टपिंग आऊट केलं. सूर्याने 13 बॉलमध्ये 12 रन्स केल्या.

  • 12 Feb 2026 07:41 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : भारताला मोठा झटका, इशान किशन आऊट

    नामिबियाने भारताला दुसरा झटका दिला आहे. नामिबियाने झंझावाती खेळी करणाऱ्या इशान किशन याला आऊट करत धावांना ब्रेक लावला आहे. इशानने 24 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 6 फोरसह एकूण 61 रन्स केल्या.

  • 12 Feb 2026 07:36 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : इशानचा पावर प्ले, सहाव्या ओव्हरमध्ये सलग 4 सिक्स, ठोकल्या 28 धावा

    इशान किशन याने पावर प्लेच्या सहाव्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धमाका केला. इशानने सलग 4 सिक्स लगावले. त्यानंतर इशानने सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला. इशानने यासह सहाव्या ओव्हरमध्ये 28 धावा केल्या. इशानने यासह 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

  • 12 Feb 2026 07:27 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : भारताची जबरदस्त सुरुवात, इशान-तिलक जोडीची फटकेबाजी

    टीम इंडियाने संजू सॅमसन याच्या रुपात दुसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर इशान किशन आणि तिलक वर्मा या दोघांनी भारताला वेगवान सुरुवात दिली आहे. भारताने 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 58 रन्स केल्या आहेत. इशान 22 आणि तिलक 13 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 12 Feb 2026 07:12 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : संजूच्या खेळीचा दुसऱ्या ओव्हरमध्येच द एन्ड, टीम इंडियाला पहिला झटका

    नामिबियाने टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. संजू सॅमसन याच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. संजूला चांगली सुुरवात मिळाली होती. मात्र संजू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. संजूने  8 चेंडूत 22 धावा केल्या.

  • 12 Feb 2026 07:00 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Score Updates : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, संजू-इशान सलामी जोडी मैदानात

    टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामन्याला सुरुवात झाली आहे. नामिबियाने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. भारताकडून इशान किशन आणि आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 12 Feb 2026 06:41 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी

    अभिषेक शर्माची तब्येत खराब असल्याने संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे. आता अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

  • 12 Feb 2026 06:39 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : नामिबियाची प्लेइंग 11

    नामिबिया (प्लेइंग इलेव्हन): लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, झेन ग्रीन (विकेटकीपर), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो

  • 12 Feb 2026 06:38 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : टीम इंडियाची प्लेइंग 11

    भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

  • 12 Feb 2026 06:38 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की…

    सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. त्याबद्दल खूप आनंदी. जोपर्यंत आम्ही नाणेफेक हरतो आणि सामना जिंकतो तोपर्यंत आम्हाला ते मान्य आहे. दव हा एक मोठा घटक असणार आहे, परंतु जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन एकूण धावसंख्येचा बचाव करता तेव्हा ते तुम्हाला आत्मविश्वास देते. अभिषेक अजूनही ठीक नाही, तो एक-दोन सामने गमावेल. संजू सॅमसन येईल आणि तसाच फलंदाज आहे. सिराजऐवजी बुमराह येतो.

  • 12 Feb 2026 06:36 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : नामिबियाचा कर्णधार म्हणाला की…

    गेरहार्ड इरास्मस म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. हा एक अतिशय चांगला सपाट क्रिकेटिंग पृष्ठभाग आहे, पृष्ठभाग आणि दव यांच्या दृष्टिकोनातून गोलंदाजीकरणे योग्य आहे. हे आमचे कौशल्य वाढवण्याबद्दल आहे. चांगली विकेट दिसते, दुसऱ्या हाफमध्ये त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करा. म्हणूनच आम्ही मनोरंजनासाठी क्रिकेट खेळतो. आमच्याकडे दोन बदल आहेत.

  • 12 Feb 2026 06:34 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : नाणेफेकीचा कौल नामिबियाच्या बाजूने, गोलंदाजी निवडली

    नाणेफेकीचा कौल नामिबियाच्या बाजूने लागला आहे. दव फॅक्टर लक्षात घेऊन नामिबियाच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे.

  • 12 Feb 2026 06:19 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : थोड्याच वेळात टॉस

    टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्याचा थरार नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारताने या स्टेडियममध्ये आतापर्यंत 4 पैकी 2 टी 20i सामने जिंकले आहेत.

  • 12 Feb 2026 06:08 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : इंडिया-नामिबिया दुसऱ्यांदा आमनेसामने

    टीम इंडिया आणि नामिबिया या दोन्ही संघांची टी 20i वर्ल्ड कप निमित्ताने आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी टीम इंडियाने नामिबियाचा 2021 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पराभव केला होता. भारताने तेव्हा विराट कोहली याच्या नेतृत्वात हा एकतर्फी विजय मिळवला होता.

  • 12 Feb 2026 05:56 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नामिबिया टीम

    गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन (विकेटकीपर) लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, जेजे स्मिथ, रुबेन ट्रम्पेलमन, डिलन लीचर, विलेम मायबर्ग, बर्नार्ड शॉल्झ, मॅक्स हिन्गो,
    मालन क्रुगर, बेन शिकोंगो, जॅक ब्रासेल, जॅन बाल्ट आणि सपोर्ट स्टाफ.

  • 12 Feb 2026 05:53 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडिया

    इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार) अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर.

  • 12 Feb 2026 05:48 PM (IST)

    IND vs NAM, T20I WC Live Updates : टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामना

    भारत आणि नामिबिया दोन्ही संघ वर्ल्ड कप मोहिमेतील आपला दुसरा सामना एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *