
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज मनसेची बैठक झाली. आज 10.30 वाजता राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बैठक बोलवली होती. मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि मुंबईतील विभाग अध्यक्ष बैठकीसाठी उपस्थित होते. मराठी भाषा दिनाच्या संदर्भात ही बैठक होती. “यावर्षी मराठी भाषा दिन दणक्यात साजरा करणार. शिवतीर्थ वर मराठी दिन साजरा करणार. आणखी नियोजन सुरू आहे” अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. “सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लम हा झाला की, सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली का नाव घ्यायला?. उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरचे सर्व कांड घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबाबत कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांचे चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले. त्यामुळे अगं अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
“त्यामुळे त्यांना असं बोलावं लागतं. चंद्रपूरमध्ये काही कारवाई होणार नाही. चंद्रपूरचे डील होणार आहे हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहीत होते. त्यात काही सरप्राइज नाही. आता फक्त ते जे बोलले ते उलट घडतय. त्यामुळे मी मारल्या सारखं करतो, तू रडल्यासारखे कर असं आहे” इतक्या स्पष्टपणे मनसेकडून संजय राऊतांवर हल्लाबोल करण्यात आला.
उगीच Acting पुरत कोणी काही करू नये ही विनंती
“चांगले रोड खोदले आहेत. सीसी रोड पुन्हा खोदतात. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न अमित ठाकरे यांनी केला आहे” असं म्युजिकल क्लस्टर रोडवर संदीप देशपांडे म्हणाले. “अनधिकृत बांगलादेशी मध्ये अनधिकृत परप्रांतीय पण Add करावं लागेल. अनधिकृत अनधिकृत आहेत, बांगलादेशी, परप्रांतीय सर्वच आहेत. कारवाई थतूरमथुर नसावी. प्रसिद्धीसाठी नसावी. फेरीवाला धोरण त्याची अमलबजावणी करून, कायमस्वरूपी तोडगा काढावा. उगीच Acting पुरत कोणी काही करू नये ही विनंती” असं संदीप देशपांडे म्हणाले.