‘तारक मेहता’मधील अब्दुलच्या सोड्याचं गुपित आलं समोर, घरच्या घरी कसा बनवयाचा जाणून घ्या

‘तारक मेहता’मधील अब्दुलच्या सोड्याचं गुपित आलं समोर, घरच्या घरी कसा बनवयाचा जाणून घ्या
‘तारक मेहता’मधील अब्दुलच्या सोड्याचं गुपित आलं समोर, घरच्या घरी कसा बनवयाचा जाणून घ्या


छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे नाव घेतले जाते. ही मालिका जवळपास सर्वचजण पाहतात. प्रेक्षकांमध्ये सुध्दा ही मालिका खूप लोकप्रिय आहे. 28 जुलै 2008 रोजी सुरू झालेल्या या मालिकेला आता 17 वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. गोकुळधाम सोसायटीतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः ‘अब्दुल’ या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत अनेकदा पुरुष मंडळी त्याच्या दुकानात जाऊन सोडा पिताना दिसतात. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, खरोखर शूटिंगदरम्यान कलाकार सोडा पितात का? की ते फक्त सीनपुरता दाखवले जाते?

गोकुळधाममध्ये वापरला जाणारा सोडा खरा की खोटा?

मालिकेत अनेकदा कलाकार खाण्या-पिण्याचे पदार्थ फक्त सीनसाठी वापरतात, असे म्हटले जाते. पण अब्दुलची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने सांगितले की, गोकुळधाममधील सोडा खरोखरच तयार केला जातो आणि तो बनावट नसतो. शूटिंगदरम्यान जेठालाल, भिडे, मेहता साहेब आणि इतर मंडळी तोच सोडा खरोखर पितात. म्हणजेच हा सीन फक्त दाखवण्यासाठी नसून त्यामागे खरी तयारी केलेली असते.

गोकुळधाममधील खास सोडा बनवण्याची पध्दत काय?

मालिकेत दाखवण्यात येणारा हा सोडा बनवण्याची पद्धतही खुप खास आहे. प्रथम ग्लासमध्ये मसाला टाकला जातो, त्यानंतर ताजा लिंबू कापून त्याचा रस पिळला जातो. मग त्यात थंड सोडा टाकून सर्व मिश्रण एकत्र केले जाते. काही क्षणांतच चविष्ट आणि ताजेतवाने करणारा सोडा तयार होतो. त्यामुळेच गोकुळधाममधील हा सोडा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो.

सोडा पिण्याचे फायदे काय?

1.पचनास मदत – काहींना हलक्या अपचनात किंवा जडपणात आराम मिळू शकतो

2.ताजेतवाने वाटते – थंड सोडा प्यायल्यानंतर लगेच फ्रेश वाटते

3. मळमळ कमी होण्यास मदत – काही वेळा मळमळ होत असल्यास सोडा प्यायल्यामुळे आराम मिळतो

सोडा पिण्याचे तोटे काय?

1. पोटात गॅस तयार होणे – सोड्यातील कार्बोनेशनमुळे ढेकर येणे, पोट फुगू शकते

2. आम्लपित्त वाढणे – वारंवार घेतल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो

3. वजन वाढ – साखरयुक्त सोडा घेतल्यास कॅलरीज जास्त मिळतात. त्यामुळे वजन वाढू शकते

4. मधुमेहाचा धोका – जास्त साखर असलेला सोडा प्यायल्यामुळे रक्तातील साखर वाढते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *