Headlines

केएल राहुलने ठोकलं 25वं शतक, अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया व्हायरल Watch Video

केएल राहुलने ठोकलं 25वं शतक, अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया व्हायरल Watch Video
केएल राहुलने ठोकलं 25वं शतक, अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया व्हायरल Watch Video


केएल राहुलने ठोकलं 25वं शतक, अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया व्हायरल Watch VideoImage Credit source: PTI

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेतील उपांत्य फेरीत कर्नाटकची लढत उत्तराखंडशी होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल उत्तराखंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या स्थितीचा फायदा कर्नाटकने पुरेपूर घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ कर्नाटकने गाजवला. केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांच्या शतकी खेळीमुळे संघाच्या धावा 300 पार गेल्या आहेत. केएल राहुलने या सामन्यात पुन्हा एकदा फलंदाजीचं कौशल्य दाखवलं. उपांत्यपूर्व फेरीनंतर उपांत्य फेरीत शतक ठोकलं. तर कर्णधार देवदत्त पडिक्कलनेही कर्णधार म्हणून पहिल्या शतकाची नोंद केली आहे. हा सामना पाहण्यासाठी केएल राहुलचे सासरे सुनील शेट्टी मैदानात उपस्थित होते. केएल राहुलने शतक ठोकताच सासरे सुनील शेट्टी यांनी उभे राहिले आणि टाळ्या वाजवल्या. आहानने देखील तसंच केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केएल राहुल 211 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकार मारून 141 धावांवर बाद झाला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 66.82चा होता. आदित्य रावतच्या गोलंदाजीवर त्यानेच त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.केएल राहुल रणजी ट्रॉफीत चांगली कामगिरी करत आहे. उपांत्यपूर्व फेरीतही केएल राहुलने मुंबईविरुद्ध दुसऱ्या डावात शतक ठोकलं होतं. त्याच्या या खेळीमुळे कर्नाटकने उपांत्य फेरी गाठली आहे. मुंबईने कर्नाटकसमोर विजयासाठी 325 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना केएल राहुलने 182 चेंडूत 130 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

केएल राहुलने फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. मागच्या पाच सामन्यातील हे तिसरं शतक आहे. केएल राहुलने फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरमधील 25वं शतक पूर्ण केलं. रणजी ट्रॉफीत खेळण्यापूर्वी केएल राहुल न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामना खेळला. यात त्याने नाबाद 112 धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपताच केएल राहुल कर्नाटक संघात रणजी ट्रॉफीसाठी रूजू झाला. मोहालीत पंजाबविरुद्ध पहिल्या डावात 59 धावांची खेळी केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत मुंबईविरुद्ध दुसऱ्या डावात शतक आणि आता पुन्हा एकदा शतकी खेळी केली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *