
15 Feb 2026 10:16 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : भारताने पाकिस्तानला 61 धावांनी नमवलं
भारताने पाकिस्तानवर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 8-1 अशी आघाडी घेतली आहे. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हाान दिलं होतं. पण पाकिस्तानला हे आव्हान काही गाठता आलं नाही. पाकिस्तानच्या विकेट धडाधड विकेट पडल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ विजयापासून दूर गेला. या विजयासह भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे. तर पाकिस्तानचं गणित जर तर वर आलं आहे.
15 Feb 2026 10:07 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : वरूण चक्रवर्ती हॅटट्रीक घेणार का?
पाकिस्तान अडचणीत असताना वरूण चक्रवर्तीने आणखी अडचणीत आणलं. त्याने सलग दोन चेंडूत दोन विकेट काढल्या. त्यामुळे भारत आता विजयापासून एक विकेट दूर आहे. वरूण चक्रवर्तीची मात्र हॅटट्रीक हुकली.
15 Feb 2026 10:04 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : पाकिस्तानला आठवा धक्का
भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. या सामन्यात पाकिस्तानला कुठेच डोकं वर काढता आलं नाही. फहीम अश्रफ मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. फक्त 10 धावा करून तंबूत परतला आहे.
15 Feb 2026 09:49 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : तिलक वर्माने काढली सातवी विकेट
पाकिस्तानला शादाब खानच्या रुपाने सातवा धक्का बसला. तिलक वर्माने टाकलेल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याची विकेट पडली. उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बाद झाला. आता भारतीय संघ विजयापासून तीन विकेट दूर आहे.
15 Feb 2026 09:46 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : पाकिस्तानला सहावा धक्का
पाकिस्तानला मोहम्मद नवाजच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. कुलदीप यादवच्या गोलंदाजी मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. नवाज फक्त 4 धावा करून बाद झाला.
15 Feb 2026 09:41 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : उस्मान खानच्या रुपाने पाचवा धक्का
पाकिस्तानला उस्मान खानच्या रूपाने पाचवा धक्का बसला आहे. त्याच्याकडून पाकिस्तानला फार अपेक्षा होत्या. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू थेट इशान किशनच्या हाती गेला. त्याने जराही चूक न करता स्टम्प आऊट केलं. उस्मान खान 44 धावांवर बाद झाला.
15 Feb 2026 09:39 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : पाकिस्तानच्या 10 धावात 71 धावा
पाकिस्तानने 10 षटकात 4 गडी गमवून 71 धावा केल्या आहेत. उस्मान खान आणि शादाब खान यांनी डाव सावरला आहे. आता 10 षटकात 104 धावांची गरज आहे. उस्मान खान 44 आणि शादाब खान 12 धावांवर खेळत आहे.
15 Feb 2026 09:34 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : उस्मान खानने भारताचं टेन्शन वाढवलं, पाचव्या विकेटसाठी जोडी जमली
पाकिस्तानच्या चार विकेट पडल्यानंर उस्मान खानने बाजू सावरली आहे. फिरकीला चांगल्या पद्धतीने त्याने सामना केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिलक वर्माने त्याचा झेल सोडल्याने टेन्शन वाढवलं आहे.
15 Feb 2026 09:22 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : पाकिस्तानच्या पावरप्लेमध्ये 4 गडी बाद 38 धावा, भारत मजबूत स्थितीत
पावर प्लेमध्ये भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 38 धावांवर रोखलं. तसेच चार विकेटही काढल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ पुरता बॅकफूटवर गेला आहे. आणखी दोन विकेट मिळाल्या तर हा सामना भारताच्या पारड्यात पूर्णपणे झुकेल. उस्मान खानची विकेट मिळाली तर पाकिस्तानचा पराभव निश्चित होईल.
15 Feb 2026 09:17 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : पाकिस्तानला चौथा धक्का, बाबर आझमचा खेळ खल्लास
बाबर आझमच्या रुपाने पाकिस्तानला चौथा धक्का बसला आहे. अक्षर पटेलने चौथं यश मिळवून दिलं आहे. आक्रमक फटका मारण्याच्या नादात चुकला आणि त्रिफळा उडाला. बाबर आझम 5 धावा करून बाद झाला. पाकिस्तानचा संघ पावरप्लेमध्ये दडपणात आला आहे.
15 Feb 2026 09:07 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : सलमान आगाच्या रुपाने तिसरा धक्का
पाकिस्तानला सलमान आगाच्या रुपाने तिसरा धक्का बसला आहे. सलमान आगा 4 धावा करून तंबूत परतला आहे. पावरप्लेमध्ये पाकिस्तानच्या धावगतीला ब्रेक मिळाला आहे. पाकिस्तानच्या 20 धावांवर तीन विकेट गेल्या आहेत. जसप्रीत बुमराहने एकाच षटकात दोन धक्के दिले.
15 Feb 2026 09:01 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : जसप्रीत बुमराहकडून सॅम अय्युबचा गेम, पाकिस्तानला दुसरा झटका
टीम इंडियाने पाकिस्तानला सलग दुसऱ्या ओव्हरमध्ये झटका दिला आहे. हार्दिक पंड्या याने पहिल्या ओव्हरमध्ये साहिबजादा फरहान याला आऊट केलं. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह याने सॅम अय्युब याला एलबीडब्ल्यू आऊट केलं.
15 Feb 2026 08:57 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : हार्दिकची कमाल, पाकिस्तानला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका, साहिबजादा फरहान आऊट
टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने कमाल केली आहे. हार्दिकने 176 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला आहे. हार्दिकने साहिबजादा फरहान याला रिंकू सिंह याच्या हाती 0 वर कॅच आऊट केलं आहे.
15 Feb 2026 08:55 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Score Updates : पाकिस्तानच्या बॅटिंगला सुरुवात, साहिबजादा-सॅम सलामी जोडी मैदानात, 176 धावांचं आव्हान
पाकिस्तानच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि सॅम अय्युब ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
15 Feb 2026 08:42 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : कोलंबोत पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान, टीम इंडिया रोखणार?
टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. भारतासाठी इशान किशन याने सर्वाधिक 77 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 32 धावांचं योगदान दिलं. शिवम दुबे याने 27 तर तिलक वर्मा याने 25 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानसाठी सॅम अयुब याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
15 Feb 2026 08:34 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : कॅप्टन सूर्यकुमार आऊट, भारताला पाचवा झटका
पाकिस्तानने भारताला पाचवा झटका दिला आहे. उस्मान तारीक याने कॅप्टन सूर्यकुमार यादव याला सॅम अय्युब याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. सूर्याने 32 धावा केल्या.
15 Feb 2026 08:27 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : पाकिस्तानची चिवट बॉलिंग, सूर्या-शिवमचा धावांसाठी संघर्ष
पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांचा धावांसाठी संघर्ष पाहाला मिळत आहे. भारताने 17 ओव्हरमध्ये 4 आऊट 140 धावा केल्या आहेत. सूर्या 26 आणि शिवम 10 धावांवर नाबाद खेळत आहेत. आता टीम इंडिया 18 बॉलमध्ये किती धावा जोडण्यात यशस्वी होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
15 Feb 2026 08:15 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : सॅम अय्युबचा दणका, भारताला सलग 2 झटके, तिलकनंतर हार्दिक आऊट
पाकिस्तानने टीम इंडियाला तिसरा झटका दिला आहे. फिरकीपटू सॅम अय्युब याने सेट तिलक वर्मा याला एलीडब्ल्यू आऊट केलं आहे. तिलकने 24 बॉलमध्ये 25 रन्स केल्या. त्यानंतर सॅमने पुढच्याच बॉलवर हार्दिक पंड्या याला बाबर आझम याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 14.3 ओव्हरमध्ये 4 आऊट 126 असा झाला आहे.
15 Feb 2026 08:08 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : तिलक-सूर्या जोडी सेट, चाहत्यांना फटकेबाजीची प्रतिक्षा
तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव ही जोडी सेट झाली आहे. मात्र आता चाहत्यांना या दोघांकडून फटकेबाजीची प्रतिक्षा आहे. भारताने 14 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 125 धावा केल्या आहेत. सूर्या 21 तर तिलक 25 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
15 Feb 2026 07:55 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : तिलक वर्माचा षटकार, भारताचं शतक पूर्ण
नवाज याने टाकलेल्या 12 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर तिलक वर्मा याने षटकार ठोकला. य़ासह टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या. तिलक 19 आणि सूर्या 8 धावांवर नाबाद खेळत आहेत.
15 Feb 2026 07:50 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : टीम इंडियाच्या 10 ओव्हरनंतर किती धावा?
टीम इंडियाने 10 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 92 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव ही जोडी मैदानात खेळत आहे. तिलक वर्मा 12 आणि सूर्यकुमार यादव 3 ही जोडी मैदानात खेळत आहे. त्याआधी इशान किशन 77 धावा करुन आऊट झाला. तर अभिषेक शर्मा याला भोपळाही फोडता आला नाही.
15 Feb 2026 07:43 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : इशान किशनच्या स्फोटक खेळीचा शेवट, भारताला दुसरा झटका
सॅम अय्युब याने इशान किशन याच्या स्फोटक खेळीला ब्रेक लावला आहे. सॅमने इशानला बोल्ड केलं आहे. इशानने सॅमच्या बॉलिंगवर जागा करुन फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात इशानचा अंदाज चुकला आणि बॉल थेट स्टंपवर लागला. इशान अशाप्रकारे आऊट झाला. इशानने 40 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्ससह 77 रन्स केल्या.
15 Feb 2026 07:29 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : इशान किशनचा तडाखा, पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक
इशान किशन याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. इशानने सातव्या ओव्हरमधील सलग पहिल्या 2 बॉलवर फोर लगावले. इशानने यासह अर्धशतक पूर्ण केलं.
15 Feb 2026 07:18 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : इशान-तिलक जोडी जमली, मोठ्या खेळीची आशा
पाकिस्तानने टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. अभिषेक शर्मा सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर इशान किशन याला साथ देण्यासाठी तिलक वर्मा मैदानात आला. इशान आणि तिलर या जोडीने भारताला 4 ओव्हरपर्यंत 30 रन्सपर्यंत पोहचवलंय. इशान 25 आणि तिलक 5 धावांवर नाबाद खेळत आहेत.
15 Feb 2026 07:04 PM (IST)
India vs Pakistan, T20 WC 2026 LIVE Score: टीम इंडियाला पहिला धक्का, अभिषेक शर्मा बाद
टीम इंडियाला अभिषेक शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. त्याला खातंही खोलता आलं नाही. या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी अमेरिकेविरुद्ध खातं खोलू शकला नव्हता.
15 Feb 2026 07:01 PM (IST)
India vs Pakistan, T20 WC 2026 LIVE Score: अभिषेक शर्मा आणि इशान किशन जोडी मैदानात
भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन ही जोडी मैदानात आली आहे. अभिषेक शर्मा आजारपणातून बरा होऊन मैदानात परतला आहे. त्याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
15 Feb 2026 06:40 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: पाकिस्तानची प्लेइंग 11
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, उस्मान तारिक
15 Feb 2026 06:39 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: भारताची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
15 Feb 2026 06:38 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की…
आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. आम्ही शेवटचे दोन सामने बचाव करताना जिंकले होते म्हणून आम्हाला ते बदलायचे नाही. हा एक प्रसंग आहे, हा एक महत्त्वाचा सामना आहे. हा खेळ तुम्हाला खूप काही शिकवतो, कोणताही संघ दिलेल्या दिवशी सामना जिंकू शकतो. दोन बदल केले आहेत. अभिषेक शर्मा आला आहे आणि अर्शदीप सिंगऐवजी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.
15 Feb 2026 06:37 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा काय म्हणाला…
आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. ते थोडे चिकट दिसते, म्हणून आम्हाला वाटते की ते पहिल्या काही षटकांसाठी गोलंदाजांना मदत करेल म्हणून आम्हाला ते वापरायचे आहे. आम्ही आमच्या गटात आरामशीर आहोत आणि या आव्हानासाठी उत्सुक आहोत. एसएससीपेक्षा मोठे मैदान आणि खेळपट्टी एसएससीपेक्षा हळू आहे. आम्ही त्याच संघासह खेळणार आहोत.
15 Feb 2026 06:34 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने, प्रथम गोलंदाज स्वीकारली
नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करून जास्तीत जास्त धावा कराव्या लागणार आहेत. कारण नंतर दव पडलं तर गोलंदाजी करणं कठीण जाईल.
15 Feb 2026 06:16 PM (IST)
IND vs PAK, T20 World Cup 2026 Live Updates : दोन्ही संघ स्टेडियममध्ये दाखल, थोड्याच वेळात टॉस
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे खेळाडू हॉटेलमधून बसद्वारे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये अवघ्या काही मिनिटांपूर्वी दाखल झाले आहेत. आता थोड्याच मिनिटात टॉस होणार आहे.
15 Feb 2026 06:02 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, थोड्याच वेळात टॉस
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला आता मोजून 1 तास बाकी आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या टॉसकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
15 Feb 2026 05:55 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: कोलंबोमधील हवामानाची स्थिती काय?
कोलंबोमधील हवामान बदलत आहे. पावसाचे अंदाज बदलत आहेत. बीबीसी वेदरनुसार, कोलंबोमध्ये संध्याकाळी 6.30 वाजता पावसाची शक्यता 40 टक्के आहे. 7.30 वाजता ही शक्यता 32 टक्के आहे. रात्री 8.30 वाजता ही शक्यता 20 टक्क्यांपर्यंत कमी असणार आहे.
15 Feb 2026 05:35 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: हस्तांदोलन करणार की नाही? वादावर मोठी अपडेट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा नाणेफेकीदरम्यान पाकिस्तानी कर्णधार सलमान आघाशी हस्तांदोलन करणे टाळेल. गेल्या वर्षीच्या आशिया कपमध्येही अशीच घटना घडली होती.
15 Feb 2026 05:22 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: टीम इंडिया 13 वा सामना जिंकणार?
आतापर्यंत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 16 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने 16 पैकी सर्वाधिक 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया कोलंबोत पाकिस्तावर मात करत 13 वा विजय नोंदवणार का? याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे.
15 Feb 2026 05:12 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन
सलमान आगा (कॅप्टन), साहिबजादा फरहान, बाबर आझम, उस्मान खान (विकेटीकीपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक आणि अबरार अहमद.
15 Feb 2026 05:11 PM (IST)
T20 World Cup 2026 Live: टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन
अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह और वरुण चक्रवर्ती.
15 Feb 2026 04:57 PM (IST)
IND vs PAK T20 world Cup 2026 Live Updates : टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानवर वरचढ
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांची 15 फेब्रुवारीला आयसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने येण्याची नववी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात 8 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 8 पैकी 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान केवळ 1 सामन्यातच विजय मिळाला आहे.
15 Feb 2026 04:49 PM (IST)
IND vs PAK T20 world Cup 2026 Live Updates : भारत-पाकिस्तान दोन्ही संघ अजिंक्य
टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी एकाच ग्रुपमध्ये आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याआधी दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने खेळले आहेत. दोन्ही संघाने आपली दोन्ही सामने जिंकले आहेत. टीम इंडिया नेट रनरेट चांगला असल्या ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे.
15 Feb 2026 04:37 PM (IST)
IND vs PAK T20 world Cup 2026 Live Updates : टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.
15 Feb 2026 04:31 PM (IST)
IND vs PAK T20 world Cup 2026 Live Updates : टीम इंडिया भूमिकेवर ठाम, पाकिस्तान विरुद्ध हस्तांदोलन नाहीच!
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला अवघ्या काही मिनिटांचा अवधी बाकी आहे. त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. इंडियन्स एक्सप्रेसनुसार, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगासह हस्तांदोलन करणार नाही. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सूर्याला हस्तांदोलनबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. सूर्याने यावर 24 तास थांबा, असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे हस्तांदोलन होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता सूर्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं जात आहे.
15 Feb 2026 04:23 PM (IST)
IND vs PAK T20 world Cup 2026 Live Updates : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी पाकिस्तान टीम
सलमान आगा (कर्णधार), सॅम अयुब, साहिबजादा फरहान, बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, उस्मान तारिक, फखर जमान, नसीम शाह, सलमान मिर्झा आणि ख्वाजा नाफे.
15 Feb 2026 04:21 PM (IST)
IND vs PAK T20 world Cup 2026 Live Updates : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (विकेटीकप), संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर.
15 Feb 2026 04:18 PM (IST)
IND vs PAK T20 world Cup 2026 Live Updates : टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करणअयात आला आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील एकूण तिसरा क्रिकेट सामना आहे.