Vastu Shastra : या चार वस्तू कधीच रिकाम्या ठेवू नका, …तर कंगाल झालाच म्हणून समजा

Vastu Shastra : या चार वस्तू कधीच रिकाम्या ठेवू नका, …तर कंगाल झालाच म्हणून समजा
Vastu Shastra : या चार वस्तू कधीच रिकाम्या ठेवू नका, …तर कंगाल झालाच म्हणून समजा


वास्तुशास्त्रानुसार घरात काही अशा वस्तू असतात त्या जर आपण रिकाम्या ठेवल्या तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तिचा परिणाम हा कुटुंबप्रमुखासह त्या घरातील प्रत्येक सदस्यावर होतो. जर घरात काही कारण नसताना सतत भांडणं होत असतील, किंवा अचानक काही आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. अचानक काही आर्थिक अडचणी आल्या तर घरात नकरात्मक ऊर्जा आहे, असं समजावं. वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांच्या मदतीने आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतो. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा घराची भरभराट होते. आर्थिक प्रगती होते. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात अशा काही वस्तू असतात, त्या कधीच रिकाम्या ठेवू नये, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

पर्स किंवा पाकिट – वास्तुशास्त्रामध्ये पर्स किंवा तुमच्या पाकिटाला खूप महत्त्व आहे. कारण या दोन अशा गोष्टी आहेत, ज्या नेहमी तुमची आर्थिक स्थिती दर्शवत असतात. त्यामुळे कधीही पाकिट रिकामे ठेवू नये, त्यामध्ये सतत पैसे असावेत असं वास्तुशास्त्र सांगतं. जर तुमच्या पाकिटामध्ये पैसे असतील तर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो, घरात समृद्धी येते, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

धान्याची कोठी – वास्तुशास्त्रामध्ये धान्याच्या कोठीला समृद्धीचं प्रतिक माण्यात आलं आहे. जर तुमच्या धान्याची कोठी ही रिकामी असेल तर त्याचा घरावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे घरातील धान्याची कोठी ही कधीही धान्याने भरलेली असावी, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुम्ही ज्या डब्यामध्ये पोळी ठेवतात, तो कधीही पूर्ण रिकामा नसावा, त्यामध्ये थोडं तरी अन्न शिल्लक असावं, असा सल्ला देखील वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

पूजा घरातील जलपात्र – पूजा घरात तुम्ही जे जलपात्र ठेवतात ते देखील कधीही रिकामं नसावं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. पूजा घरातील जलपात्र हे नेहमी पाण्यानं भरलेलं असावं, त्यामुळे घरात समृद्धी येते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *