तर वनमंत्रीपद काय कामाचे? शिंदे गट आणि गणेश नाईकांमध्ये जुंपली; अनेक नेत्यांची वादात उडी

तर वनमंत्रीपद काय कामाचे? शिंदे गट आणि गणेश नाईकांमध्ये जुंपली; अनेक नेत्यांची वादात उडी
तर वनमंत्रीपद काय कामाचे? शिंदे गट आणि गणेश नाईकांमध्ये जुंपली; अनेक नेत्यांची वादात उडी


वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला होता. ‘नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते, हॉस्पिटल गार्डन यासाठी भूखंडाची आम्ही मागणी करतोय. मात्र नवी मुंबईकरांचे भुखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम सिडकोने केले आहे. मला या गोष्टीची मला लाज वाटते ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळातल्या नगरविकास विकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मद्रिधी केले असून माझं राग शांत करायचं असेल तर सर्व भूखंड परत करा असं नाईक यांनी म्हटलं होतं. यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आमदार निलेश राणेंची नाईक यांच्यावर टीका

शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी म्हटले की, मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत, मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो. कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे. अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही, फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ला पैसे नाहीत, साधनसामुग्री नाही, DFO दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही.

लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय. वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे? जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो. वरील सगळे विषय गंभीर आहेत पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत.

प्लॉट कोणत्या बिल्डरांच्या घशात घातले दाखवून द्या…

गणेश नाईक यांच्या आरोपांवर बोलताना शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी म्हटले की, ‘आमच्या नेत्यांनी कोणते प्लॉट बिल्डरांच्या घशात टाकले दाखवून द्या. वनमंत्री गणेश नाईक टीव्ही चॅनेलवरती टीआरपी मिळवण्यासाठी काहीही विधान करत राहतात. नवी मुबंईत अनधिकृत बांधकामे ही गणेश नाईकांमुळे होतात. वनमंत्री गणेश नाईक यांनी अनेक प्लॉट विकले आहेत, त्यांनी आमच्या नेत्यांवर आरोप करू नये.’ तर दुसरीकडे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांनी त्याचे उत्तर द्यावं असं विधान केलं आहे.

प्रकरणाची चौकशी व्हायला हवी – वैभव नाईक

या सर्व प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले की, ‘गणेश नाईक अनेक वर्ष मंत्री आहेत. स्वबळावर नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवलीय. सातत्याने शिंदेंवर आरोप करत आहे त्या आरोपांवर बोललं पाहिजे. निलेश राणे यांच्यामध्ये एवढा दम नाहीये. की कारण रवींद्र चव्हानावर आरोप केले होते. आठ दहा दिवसांमध्ये रवींद्र चव्हाण यांना सरेंडर झाले. आता ते गणेश नाईकांना कधी सरेंडर होतील? या महिन्यात होतील की पुढच्या महिन्यात होतील हा खरा प्रश्न आहे. गणेश नाईक आणि नगर विकास खात्यावर आरोप केलेत त्याची खरोखर चौकशी झाली पाहिजे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *