डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे संपूर्ण देश संकटात, एका निर्णयाने लोकांची झोप उडाली; या देशात हाहाकार!

डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे संपूर्ण देश संकटात, एका निर्णयाने लोकांची झोप उडाली; या देशात हाहाकार!
डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे संपूर्ण देश संकटात, एका निर्णयाने लोकांची झोप उडाली; या देशात हाहाकार!


Cuba Vs America : अमेरिका हा जगातील महासत्ता देश आहे. या देशाने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम जगातील इतरही अनेक देशांवर होते. विशेष म्हणजे या देशाने एखादा आदेश दिला तर दुसऱ्या देशाची अर्थव्यवस्थाही गडगडू शकते. दरम्यान, अमेरिकेने घेतलेल्या एका भूमिकेमुळे क्यूबा या देशावर मोठं संकट आलं आहे. या देशात मोठ्या प्रमाणात विजेची टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वीज उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाल्याने क्यूबामध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा सिगार उत्सवही रद्द करण्यात आला आहे.

सिगार फेस्टिव्हल जगभरात असतो चर्चेचा विषय

अमेरिकेने क्यूबावर तेल तेलप्रतिबंध लागू केले आहेत. त्यामुळेच तेथे विजेची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. इंधनाची कमी असल्याने पूर्णवेळ वीज उपलब्ध होणे कठीण होऊन बसले आहे. त्याचाच परिणाम सिगार फेस्टिव्हलवर झाला आहे. या उत्सवाचे आयोजक हबानोस एस ए यांनी हा सिगार उत्सवच रद्द करण्याचे ठरवले आहे. या सिगार उत्सवात जगभरातील सिगार प्रेमी सहभागी होतात. जगातील सिगार वितरकांसाठी हा फेस्टिव्हल मोठी पर्वणी असतो. या काळात सहभागी झालेले लोक तंबाखू बागांचा दौरा करतात. लिलावात सहभागी होतात. परंतु आता हा सिगार फेस्टिव्हल यावेळी होणार नाही.

अमेरिकेने निर्बंध लादल्यामुळे मोठी अडचण

अमेरिकेने इंधन, वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या तेल पुरवठ्यावर निर्बंध लादल्यामुळे क्यूबाची मोठी अडचण झालीआहे. सिगार फेस्टिव्हलसोबतच इतरही काही सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. जानेवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या देशावर बंधनं घातली होती. जो देश क्यूबाला तेलाचा पुरवठा करेल त्यांच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात दंड लावू अशी धमकीच अमेरिकेने दिली होती. क्यूबामध्ये आर्थिक आणि राजकीय सुधारणा लागू करण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतलेला आहे. क्यूबा हा देश साधारण 60 टक्के तेल आयात करतो. यात व्हेनेझुएला आणि मेक्सिको हे दोन महत्त्वाचे पुरवठादार देश होते. अमेरिकेने व्हेनेझुएलावर कारवाई केल्यानंतर व्हेनेझुएला देशाकूडन क्यूबाला मिळणारा इंधन पुरवठा खंडित झाला. त्यामुळे क्यूबा हा देश जास्तच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता भविष्यात हा देश इंधन टंचाईवर नेमकी कशी मात करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *