
सपोर्टिंग रोलमध्ये प्रवास सुरु करण्याऐवजी तिला सोलो लीड रोल मध्ये स्वत:ला सिद्ध करायचं होतं, असं रवीनाने सांगितलं. काही फिल्मस रिजेक्ट करण्यामागे माझी स्वत:ची कारणं होती. जसा की कुछ कुछ होता हैं, करण मला नेहमी म्हणतो की तू माझा पहिला चित्रपट केला नाहीस. पण ‘मोहरा’नंतर मला करिअर रिस्टार्ट करायचं होतं. ते ही सोलो हिरॉईन बनून. म्हणून मी करणचा तो चित्रपट केला नाही.