Headlines

Elon Musk: 77 लाख कोटींचा मालक; पण एलॉन मस्क याच्या खिशात नगद रोकड किती?

Elon Musk: 77 लाख कोटींचा मालक; पण एलॉन मस्क याच्या खिशात नगद रोकड किती?
Elon Musk: 77 लाख कोटींचा मालक; पण एलॉन मस्क याच्या खिशात नगद रोकड किती?


Elon Musk Cash Networth: गेल्या काही वर्षांपासून एलॉन मस्क हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Person in the World) आहे. फोर्ब्स मासिकानुसार, त्याची एकूण संपत्ती (Elon Musk Net Worth) जवळपास 850 अब्ज डॉलर (77 लाख कोटी रुपयांहून अधिक) आहे. आता टेस्ला आणि स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क आता संपत्ती आणि जगातील पहिला ट्रिलियन होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचवेळी मस्क याने त्याच्याकडे किती रोकड, कॅश आहे याची माहिती दिली आहे.

कॅश नाही या इथं आहे संपत्ती?

Social Media Platform X वर त्याने एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार मस्क याच्याकडे रोख रक्कम नाही. तर बड्या कंपन्यांमध्ये त्याचा वाटा आहे. त्यामुळे त्याच्या ज्या ज्या कंपन्यांचे शेअर वाढतो, तशी त्याची संपत्ती वाढते. त्याची बाजारातील पत आणि भांडवल तसे वाढते. त्याचप्रमाणात एलॉन मस्क याच्या संपत्तीत वाढ होते. म्हणजे तो कॅश, रोख रक्कम काही घरात ठेवत नाही. तर कमाईची रक्कम ही तो त्याच्या कंपनीत पुन्हा गुंतवतो. त्यामुळे त्याची कमाई अजून वाढते.

कोणता शेअर किती वधारला?

गेल्या 6 महिन्यात टेस्लाचा शेअर 24.55 टक्क्यांनी उसळला. तर अनलिस्टेड बाजारात स्पेसएक्सचा शेअर 143 टक्क्यांनी वधारला. मस्क याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. त्याचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला.

मस्क याच्याकडे किती आहे रोख रक्कम?

एलॉन मस्क याच्या पोस्टनुसार, त्याच्याकडे एकूण संपत्तीच्या 0.1 टक्क्यांहूनही कमी रोख रक्कम आहे. 850 अब्ज डॉलरमधील 0.1 टक्के म्हणजे केवळ त्याच्याकडे 85 कोटी डॉलरपेक्षा कमी रक्कम आहे. 85 कोटी डॉलर भारतीय चलनात 7708 कोटी रुपये होतात. म्हणजे मस्क याच्याकडे 7708 कोटी रुपयांहून कमी रोख रक्कम आहे. म्हणजे खेळती रक्कम आहे.

मस्ककडे पेपरवेल्थ

मस्क याच्या मते त्याच्याकडे पेपरवेल्थ आहे. म्हणजे शेअरमध्ये त्याची गुंतवणूक आहे. त्याच्याकडे रोख रक्कमऐवजी इक्विटीत पैसा आहे. टेस्ला आणि स्पेसएक्स या दोन्ही कंपन्यांमुळे त्याच्याकडे आर्थिक सत्ता आहे. स्टॉकची किंमत वाढली की त्याची संपत्ती वाढते आणि तशीच कमी होते. पण तो खेळते भांडवल ही गुंतवणूक म्हणूनच वापरतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *