Team India : भारताचं Super 8 फेरीचं वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

Team India : भारताचं Super 8 फेरीचं वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?
Team India : भारताचं Super 8 फेरीचं वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?


Team India Super 8 Schedule T20 WC 2026Image Credit source: @akshar2026 X Account

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 32 व्या सामन्यात बी ग्रुपमधील आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे तब्बल पावणे 3 तासांचा खेळ वाया गेला. तसेच त्यानंतरही सामना होण्यासारखी स्थिती नव्हती. त्यामुळे पंचांनी परिस्थिती पाहता दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या संमतीने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं. या निर्णयानंतर भारतीय संघाचं सुपर 8 फेरीतील सामने कुणाविरुद्ध असणार हे स्पष्ट झालं आहे. टीम इंडियाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यांबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

झिंबाब्वेची सुपर 8 मध्ये धडक

झिंबाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना समसमान 1-1 गुण देण्यात आला. झिंबाब्वेने याआधी खेळलेले दोन्ही सामने जिंकले होते. झिंबाब्वेचे 1 गुणासह एकूण 5 पॉइंट्स झाले. झिंबाब्वेने यासह सुपर 8 मध्ये धडक दिली. तर सामना रद्द झाल्याने आयर्लंडसह चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचंही साखळी फेरीतूनच पॅकअप झालं.

झिंबाब्वे सुपर 8 मध्ये पोहचणारी सातवी टीम ठरली. यासह गतविजेत्या भारतीय संघाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यांचं चित्र स्पष्ट झालं. टीम इंडिया सुपर 8 फेरीत एकूण 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियासमोर या 3 सामन्यांत कुणाचं आव्हान असणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. टीम इंडियाने 15 फेब्रुवारीला पाकिस्तानवर मात करत सलग तिसरा सामना जिंकला होता. भारताने त्या विजयासह सुपर 8 फेरीत धडक दिली होती.

पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान

टीम इंडियासमोर सुपर 8 फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. सुपर 8 निमित्ताने 2024 टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम फेरीतील दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया 26 फेब्रुवारीला झिंबाब्वे विरुद्ध 2 हात करणार आहे. तर सूर्यासेनेसमोर सुपर 8 फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात वेस्टइंडिजचं आव्हान असणार आहे. विंडीजने या स्पर्धेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.

टीम इंडियाचं सुपर 8 फेरीतील सामन्यांचं वेळापत्रक

22 फेब्रुवारी, भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका

26 फेब्रुवारी, भारत विरुद्ध झिम्बाब्वे

1 मार्च, भारत विरुद्ध वेस्टइंडिज



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *