Headlines

सलीम खान व्हेंटिलेटरवर, प्रकृती नाजूक, रक्तदाब वाढल्याने मेंदूत रक्तस्त्राव; हेल्थ अपडेट काय?

सलीम खान व्हेंटिलेटरवर, प्रकृती नाजूक, रक्तदाब वाढल्याने मेंदूत रक्तस्त्राव; हेल्थ अपडेट काय?
सलीम खान व्हेंटिलेटरवर, प्रकृती नाजूक, रक्तदाब वाढल्याने मेंदूत रक्तस्त्राव; हेल्थ अपडेट काय?


अभिनेता सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे मंगळवारी सकाळी 8.30 वाजता लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे कौटुंबिक डॉक्टर संदीप चोप्रा यांनी त्यांना लिलावती रुग्णालयातील आयसीयूमध्ये आणलं. तिथे त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. 90 वर्षीय सलीम खान यांचा रक्तदाब अचानक वाढला होता, त्यामुळे मेंदूच्या उजव्या बाजूला अंतर्गत रक्तस्त्राव झाला. या कारणास्तव त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. आज (बुधवार) सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

‘न्यूज 24’ने दिलेल्या वृत्तानुसार, रक्तदाब वाढल्याने त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला आसलेल्या रक्तवाहिन्या फुटल्या आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला. शस्त्रक्रिया करून हा रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न डॉक्टर करणार आहेत. दरम्यान मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करत सलीम खान यांची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट केलं. ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. टीममध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चव्हाण, कार्डिओलॉजिस्ट डॉ. अजित मेनन, न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि डॉ. बिनीत अहलुवालिया यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.

मंगळवारी सलमान खान तातडीने रुग्णालयात पोहोचला होता. त्यानंतर सलीम खान यांची पहिली पत्नी सलमा आणि दुसरी पत्नी हेलनदेखील रुग्णालयात पोहोचले होते. सोबत मुलगा अरबाज खान, मुली अलविरा आणि अर्पिता खान, जावई आयुष शर्मा, नातू निर्वाण आणि अरहान हे सर्वजण रुग्णालयात त्यांच्यासोबत होते. संजय दत्तसुद्धा रुग्णालयात पोहोचला होता.

सलीम खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध पटकथालेखक आहे. जावेद अख्तर यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. सलीम-जावेद म्हणून ते ओळखले जायचे. नुकताच त्यांनी लग्नाचा 61 वा वाढदिवस साजरा केला होता. सलीम खान यांनी 1964 मध्ये सलमा यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना सलमान, अरबाज, सोहैल आणि अलवीरा ही चार मुलं आहेत. तर 1981 मध्ये त्यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. हेलन आणि सलीम यांनी अर्पिताला दत्तक घेतलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *