Skip to content
- Home
- Worker Blog
- नवी मुंबई महानगरपालिकेतील 8000 कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन, कंत्राटी कामगार कायम स्वरूपी कामगाराच्या पगाराचे हक्कदार होणार ……..

नवी मुंबई महानगरपालिकेतील 8000 कंत्राटी कामगारांना #समान_काम_समान_वेतन लागू करणे या संदर्भात आज रोजी नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब,कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे साहेब,नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम,उपायुक्त महेंद्र सप्रेसाहेब, कामगार आयुक्त, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष नितिन नाना चव्हाण तसेच नवी मुंबई महानगरपालिका कामगार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत कामगारांच्या #समान_काम_समान_वेतन लागू होण्याकरिता सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच मा.मंत्री महोदय यांनी नवी मुंबई महानगरपालिका उपस्थित प्रशासनाला लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून मंजूरी करिता मंत्रालयात सादर करण्याबाबत आदेशीत केले. यावेळी राष्ट्रवादीचे बेलापुर विधानसभेचे स्वप्नील गाडगे, अमोल मापारी, विशाल भिलारे, विश्वजित भोईटे तसेच नवी मुंबई महानगरपालिका कामगार प्रतिनिधी संजय सुतार, चंद्रकांत चिकने,राज कदम,राजेंद्र जाधव उपस्थितीत होते.



