भारत पाकिस्तानसह हे दोन संघ उपांत्य फेरीत मारणार धडक! टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने वर्तवलं भाकीत

भारत पाकिस्तानसह हे दोन संघ उपांत्य फेरीत मारणार धडक! टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने वर्तवलं भाकीत
भारत पाकिस्तानसह हे दोन संघ उपांत्य फेरीत मारणार धडक! टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने वर्तवलं भाकीत


भारत पाकिस्तानसह हे दोन संघ उपांत्य फेरीत मारणार धडक! टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने वर्तवलं भाकीतImage Credit source: BCCI Twitter

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. सुपर 8 फेरीतील गट 1 मध्ये भारत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर गट 2 मध्ये पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघ आहेत. या दोन गटातील टॉप दोन संघ उपांत्य फेरीत जागा मिळवणार आहेत. आता या दोन गटातून कोणत्या चार संघांची उपांत्य फेरीत जागा पक्की होते हे आता सांगणं कठीण आहे. पण आजी माजी क्रिकेटपटूंनी आतापर्यंतचा खेळ पाहून चार संघांची निवड केली आहे. यात युजवेंद्र चहल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद कैफ, वरून एरॉन, सबा करीम सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. भारताची माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यानेही उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवलं आहे. कोणत्या गटातून कोणते दोन संघ उपांत्य फेरीत गाठतील याबाबत सांगितलं आहे.

संजय बांगर यांच्या मते, गट 1 मधून भारत, दक्षिण अफ्रिका आणि गट 2 मधून पाकिस्तान श्रीलंका जागा मिळवतील. संजय बांगर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हे भाकीत वर्तवलं आहे. दुसरीकडे, चहलने दुसऱ्या गटातून वेगळं भाकीत वर्तवलं आहे. त्याच्या मते भारत आणि दक्षिण अफ्रिका उपांत्य फेरी गाठतील. पण दुसऱ्या गटातून इंग्लंड आणि न्यूझीलं हे संघ उपांत्य फेरीत असतील. माजी वेगवान गोलंदाज वरूण एरॉनच्या मते, भारत-वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ असतील. तर सबा करिमच्या मते, भारत-दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड-श्रीलंका हे संघ असतील. दिग्गजांनी भाकीत काही वर्तवलेलं असून पण त्यात भारतीय संघ आहेच.

सुपर 8 फेरीत तीन सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरी निश्चितपण गाठणार आहे. तर किमान दोन सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरी गाठू शकतो. पण यात समीकरण नेट रनरेटवर येऊ शकते. त्यामुळे आता पुढे काय होते? याची उत्सुकता लागून आहे. भारताचा पहिलाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. हा सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेशी, तर तिसरा सामना 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजशी होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *