Amol Kolhe | ज्यांनी विरोध केला आहे त्यांनी व्याख्यानाला यावे; अमोल कोल्हे स्पष्टच बोलले

Amol Kolhe | ज्यांनी विरोध केला आहे त्यांनी व्याख्यानाला यावे; अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
Amol Kolhe | ज्यांनी विरोध केला आहे त्यांनी व्याख्यानाला यावे; अमोल कोल्हे स्पष्टच बोलले


राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमाला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांना ओळखपत्र तपासूनच प्रवेश दिला जात आहे. आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी इरावती कर्वे सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येऊ शकते, असा आक्षेप घेत ‘सकल विद्यार्थी समूहा’ने कुलगुरूंना निवेदन दिले आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रित करणे योग्य नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे विद्यापीठात दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “ज्यांनी विरोध केला आहे त्यांनी व्याख्यानाला यावे, ऐकावे आणि प्रश्न विचारावेत. मी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे,” असे ते म्हणाले. छत्रपतींबद्दल प्रामाणिकपणे बोलत असताना कोणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना आपण राजकारण बाजूला ठेवतो, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *