
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने मोठा दणका टॅरिफच्या मुद्द्यात दिला. डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बेकायदेशीर असून अशाप्रकारे टॅरिफ लावला जाऊ शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटले. मात्र, कोर्टाच्या निर्णयाला चुकीचा म्हणत यावर नाराजी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. कोर्टाचा निर्णय येताच त्यांनी थेट लगेचच एक आदेश काढत जगातील सर्व देशांवर 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला. थोडक्यात काय तर अमेरिकेत आयात होणाऱ्या प्रत्येक मालावर 10 टक्के टॅरिफ असणार आहे. अमेरिकेच्या कोर्टाने कायद्यावर बोट ठेवत हे चुकीचे असल्याचे म्हटले. कोर्टाचा निर्णय येताच प्लॅन बी डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केला. 10 टक्के टॅरिफ लगेचच लागू केला जाईल, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून अनेक देशांना धमकावताना दिसत आहेत. कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने दणका दिला. या ऐतिहासिक न्यायालयीन लढाईमध्ये भारतीय वंशाचे वकील नील कत्याल यांनी महत्वाची भूमिका बजावली. थेट एका भारतीय वंशाच्या वकिलांनीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफची हवा काढली. डोनाल्ड ट्रम्प इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स अॅक्टचा वापर करून जगातील देशांच्या मालावर वाटेल तेवढा टॅरिफ लावत होते.
नील कत्याल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. यामधील खास बाब म्हणजे कोर्टात या महत्वाच्या विषयावर युक्तिवाद करण्यासाठी वकिलांमध्ये कॉईन उडवण्यात आला आणि त्यावरून ठरले की, हा जागतिक विषय अमेरिकेच्या कोर्टात नील कत्याल मांडणार. नील यांनी कोर्टाच म्हटले की, अध्यक्षांना नक्की शक्तीशाली अधिकार आहेत.
पण त्यापेक्षा संविधान जास्त शक्तीशाली आहे. कोर्टात बाजू मांडताना नील कत्याल यांनी सळो की पळो करून सोडले. नील कत्याल याचे आई वडील भारतातून अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. नील यांचे वडील इंजिनिअर तर आई पेशाने डॉक्टर आहे. येल लॉ स्कूलमधून पदवी मिळून अनेक वर्ष त्यांनी कोर्टात नोकरी केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला कोर्टात नडणारी व्यक्त दुसरी तिसरी कोणीही नसून भारतीय वंशाची आहे.