Headlines

Tariff : ट्रम्पकडून अतिरिक्त 10 टक्के टॅरिफचा दट्ट्या, पण कोणकोणत्या गोष्टी वगळल्या ? जाणून घ्या A to Z list

Tariff : ट्रम्पकडून अतिरिक्त 10 टक्के टॅरिफचा दट्ट्या, पण कोणकोणत्या गोष्टी वगळल्या ? जाणून घ्या A to Z list
Tariff : ट्रम्पकडून अतिरिक्त 10 टक्के टॅरिफचा दट्ट्या, पण कोणकोणत्या गोष्टी वगळल्या ? जाणून घ्या A to Z list


डोनाल्ड ट्रम्प यांचा अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय

अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ अर्थात कर हे बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलं. मात्र न्यायालयाच्या या टिप्पणीनंतरही ट्रम्प यांना काहीच फरक पडला नाही, उलट त्यांनी संपूर्ण जगावर अतिरिक्त 10 ०% कर लादण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश येत्या आठवड्यातच, 24 फेब्रुवारी रोजी रात्री 12:01 वाजता लागू होईल. पण हे अतिरिक्त शुल्क किंवा टॅरिफ सर्वांना लागू होईल की काही वस्तूंना त्यातून सूट मिळेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

रिपोर्ट्सनुसार, काही उत्पादने आणि सेवा यांना या अतिरिक्त शुल्कातून सूट मिळू शकते. यामध्ये काही रेअर अर्थ मेटल्स, औषधे आणि काही ऑटो पार्ट्सचा समावेश आहे. ऊर्जा उत्पादने देखील शुल्कामुळे अप्रभावित राहतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त शुल्कातून कोणत्या वस्तूंना सूट मिळेल ते जाणून घेऊया.

कोणकोणत्या गोष्टींवर लागणार नाही टॅरिफ ?

  1. काही आवश्यक खनिजे, चलन आणि सोन्यामध्ये वापरले जाणारे धातू, ऊर्जा आणि ऊर्जा उत्पादने यांचा समावेश करण्यात आला आहे.
  2. नैसर्गिक संसाधने आणि फर्टिलायझर्स जी युनायटेड स्टेट्समध्ये उगवली जात नाहीत, त्यांचे उत्खनन केले जात नाही किंवा अन्यथा उत्पादित केली जात नाहीत किंवा देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उगवली जात नाहीत.
  3. शेतीची काही प्रॉडक्ट्स, त्यामध्ये बीफ, टोमॅटो, संत्रं यांचा समावेश आहे. या सामानावरही 10 टक्के अतिरिक्त कर लागणार नाही.
  4. फार्मास्यूटिकल्स आणि फार्मास्यूटिकल इनग्रेडिएंट्सही बाहेर ठेवण्यात आले आहेत. अमेरिका ते मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं.
  5. या 10 टक्के अतिरिक्त शुल्कातून काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनाही सूट देण्यात आली आहे.
  6. प्रवासी वाहने, काही हलके ट्रक, काही मध्यम आणि जड वाहने, बसेस आणि प्रवासी वाहनांचे काही भाग, हलके ट्रक, जड वाहने आणि बसेसवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
  7. काही एअरोस्पेस उत्पादनांनाही 10 टक्के अतिरिक्त शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
  8. माहितीपूर्ण साहित्य (उदा. पुस्तके), देणग्या आणि सोबतच्या वस्तू यांनाही 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *