Headlines

Salim Khan Health: सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, 4 दिवसांपासून रुग्णालयात पण…

Salim Khan Health: सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, 4 दिवसांपासून रुग्णालयात पण…
Salim Khan Health: सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, 4 दिवसांपासून रुग्णालयात पण…


Salim Khan Health: अभिनेता सलमान खान याचे वडील आणि दिग्गज लेखक सलीम खान यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या चार दिवसांपासून सलीम खान रुग्णालयात आहेत. अभिनेता एजाज खान याने शुक्रवारी रुग्णलायात सलीम खान यांची भेट घेतली. भेटीनंतर एजाज खान याने माध्यमांना सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील दिलासा मिळाला आहे. एजाज खान याने दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान यांची प्रकृती आता सुधारत आहे…

एजाज म्हणाला, ‘सलीम खान अद्याप आयसीयूमध्ये आहेत. पण पूर्वीपेक्षा आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जर सर्व काही ठीक राहिलं तर देवाच्या कृपेने, सलीम खान यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल आणि ते घरी परतू शकतील असा विश्वास देखील एजाज याने व्यक्त केला. ‘

17 फेब्रुवारी पासून रुग्णालयात आहे सलीम खान…

सांगायचं झालं तर, 17 फेब्रुवारी सलीम खान यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये उच्च रक्तदाब आणि मेंदूतील रक्तस्राव कमी असल्याचं आढळून आलं, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये हलवलं आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं. एवढंच नाही तर, त्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी आढळून आल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी देखील दिली होती.

सांगायचं झालं तर, जेव्हा सलीम खान रुग्णालयात दाखल करण्यात आलंय… ही बातमी कळल्यानंतर संपूर्ण खान कुटुंबिय लीलावती रुग्णालयात दाखल झाले. अभिनेता सलमान खान देखील तात्काळ रुग्णालयात पोहोचला. घरातील प्रमुख व्यक्तीची प्रकृती खालावल्यामुळे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर देखील निराशा दिसून आहे. पण आता सलीम खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तर बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांची रुग्णालयात जावून भेट घेत आहेत. जावेद अख्तर, संजय दत्त यांनी देखील रुग्णालयात जात सलीम खान यांची विचारपूस केली.  सध्या सर्वत्र सलीम खान यांच्या प्रकृतीची चर्चा सुरु आहे, सलीम खान यांचं वय 90 वर्ष आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *