‘अशोभनीय आणि निंदनीय कृत्य’, एआय समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकत्यांकडून गोंधळ, मायावतींसह विरोधी नेते संतापले

‘अशोभनीय आणि निंदनीय कृत्य’, एआय समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकत्यांकडून गोंधळ, मायावतींसह विरोधी नेते संतापले
‘अशोभनीय आणि निंदनीय कृत्य’, एआय समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकत्यांकडून गोंधळ, मायावतींसह विरोधी नेते संतापले


राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान भारतीय युवा काँग्रेसने समिटमध्ये घुसून शर्ट काढून निषेध केला. यामुळे या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. या प्रकरणी चार निदर्शकांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपकडून शर्टलेस निषेधाचा तीव्र विरोध केला जात आहे. आता अनेक विरोधी पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसप प्रमुख मायावती आणि जगन मोहन रेड्डी यांनी एआय समिटमध्ये युवा काँग्रेसने केलेले कृत्य लाटणारं आहे असं म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी सोशल मीडियावर या निषेधावर टीका करताना म्हटले की, “दिल्लीत ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये भारत आणि परदेशातील अनेक प्रमुख लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत होता. अर्धनग्न कपडे घालून आपला राग व्यक्त करणारे लोक, ज्यांपैकी बहुतेक काँग्रेसशी संबंधित आहेत, हे कृत्य अत्यंत अशोभनीय आणि निंदनीय आहेत.”

हे वर्तन चिंताजनक – मायावती

मायावती यांनी पुढे म्हटले की, ‘जर ही परिषद आंतरराष्ट्रीय स्तरावरची नसती तर ती वेगळी बाब असती, परंतु शिखर परिषदेदरम्यान असे वर्तन चिंतेचा विषय आहे. आपल्या देशाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा डागाळली गेली नाही तर ते योग्य ठरेल.” मायावतींच्या या प्रतिक्रियेवर बोलताना युवा काँग्रेसने म्हटले आहे की, “तुम्ही भाजपसाठी फलंदाजी करत राहा, मात्र आम्ही देशासाठी लढू.”

युथ काँग्रेसच्या निषेधाबाबत, वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी म्हणाले की, “काल, एआय समिटमध्ये युवा काँग्रेसने आपल्या सर्वांना लाजवणारे कृत्य केले. कोणीही आपल्या देशाचा अनादर करू नये. आपले राजकीय मतभेद काहीही असले तरी आपण जगासमोर नेहमीच एकजूट राहिले पाहिजे.”

क्षुल्लक राजकीय नाटकासाठी हे कृत्य योग्य नाही : केटीआर

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि माजी मंत्री केटीआर यांनीही या निषेधावर निराशा व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, “युथ काँग्रेसने क्षुल्लक राजकीय नाटकासाठी एआय इम्पॅक्ट समिटची निवड केली हे खूप वाईट आहे. निषेधासाठी अशा जागतिक व्यासपीठाचा वापर केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या महान देशाची, भारताची वाईट प्रतिमा निर्माण होईल.”

ते पुढे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये वेगवेगळी मते असणे सामान्य आहे, परंतु कुठे आणि कसे निषेध करायचा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. राजकीय मतभेदांसाठी एक वेळ आणि ठिकाण असते आणि आंतरराष्ट्रीय शिखर परिषद निश्चितच त्यापैकी एक नाही.”

देशाची प्रतिष्ठा कमी होत आहे – लोकेश नारा

काँग्रेसच्या या निदर्शनाबाबत, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाचे सरचिटणीस आणि मंत्री लोकेश नारा म्हणाले की, “काल एआय समिटमध्ये युवा काँग्रेसने केलेल्या व्यत्ययामुळे मी निराश झालो आहे. हे जागतिक व्यासपीठ भारताचे वाढते नेतृत्व उदयोन्मुख एआय महासत्ता म्हणून दाखवण्यासाठी होते. अशा मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे राजकीय तमाशात रूपांतर केल्याने जगात आपली सामूहिक प्रतिष्ठा कमी होते.”





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *