Headlines

साई मंदिर परिसरात दर अर्ध्या तासाने वेषांतर करून येतात अन् चोरी करून जातात, आंध्रातील त्या टोळीने शिर्डी हादरली

साई मंदिर परिसरात दर अर्ध्या तासाने वेषांतर करून येतात अन् चोरी करून जातात, आंध्रातील त्या टोळीने शिर्डी हादरली
साई मंदिर परिसरात दर अर्ध्या तासाने वेषांतर करून येतात अन् चोरी करून जातात, आंध्रातील त्या टोळीने शिर्डी हादरली


अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात संपूर्ण देशातून भाविक येत असतात. दररोज येथे हजारो भाविक दर्शन घेतात. मात्र आता शिर्डीतून भयंकर प्रकार समोर आला आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात दर अर्ध्या तासाने कपडे बदलून भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरीचा डाव आखणाऱ्या आंध्र प्रदेशातील टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन महिला, एक पुरुष आणि एका बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींकडून महागड्या कंपनीचे मोबाइल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाविकांच्या वस्तूंची चोरी

साई मंदिर परिसरात एका भाविकाची पर्स ब्लेडने कापली गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. काही महिला आणि पुरुष साई मंदिर परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना सीसीटीव्हीत दिसून आले. या संशयितांना ताब्यात घेतले असता एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. उर्वरित एक पुरुष, दोन महिला आणि एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेण्यात आले.

वेशांतर करून चोरी

अटक करण्यात आरोपींच्या झडतीदरम्यान त्यांच्याकडून 10 मोबाइल फोन, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर तसेच अल्पवयीन बालकाकडूनही एक मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. यातील बालकाला तातडीने चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आले आहे. ही टोळी भाविकांसारखाच वेश परिधान करून गर्दीत मिसळत होती. महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला होता, तर नंतर साडी परिधान करून पुन्हा परिसरात वावरल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. चोरट्यांची ही पद्धत पाहून पोलिसही अचंबित झाले. या वेशांतराच्या माध्यमातून पोलिस आणि मंदिर सुरक्षा रक्षकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे शिर्डीत या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

शिर्डी पोलिसांसमोर चोरीला आळा घालण्याचे आवाहन

दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येत असतात. आधीच परप्रांतीय भिक्षेकऱ्यांचा विषय ऐरणीवर आलेला असताना आता शिर्डीत परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या देखील सक्रिय असल्याचे समोर आले आहे. यामुळे या चोऱ्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान शिर्डी पोलिसांसमोर आता असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *