शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करताच सुप्रिया सुळे यांचे ते व्हाटसअप स्टेट्स, म्हटले..

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करताच सुप्रिया सुळे यांचे ते व्हाटसअप स्टेट्स, म्हटले..
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करताच सुप्रिया सुळे यांचे ते व्हाटसअप स्टेट्स, म्हटले..


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. यादरम्यान कुटुंब म्हणून पवार कुटुंबिय एकत्र आले. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांचा चेहरा बरेच काही सांगून जात होता. अजित पवार यांच्या पार्थिवावरील अंत्यविधीदरम्यान शारदा प्रांगनावर शरद पवार अगोदर दाखल झाले. अजित पवार काका शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आले आणि अचानक जगाचा निरोप घेऊन गेले. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार खचल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांना पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. आता पुन्हा एकदा शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यादरम्यानच शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हाटसअप स्टेट्स ठेवून याबाबत माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाटसअप स्टेट्समध्ये म्हटले की, आम्ही बाबांना पुढील चाचण्या आणि हायड्रेशनसाठी पुण्यातील रुबी हॉलमध्ये दाखल करत आहोत… सर्व डॉक्टर आणि आरोग्यसेवक कर्मचाऱ्यांचे आभार.

शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच रुबी हॉलमध्ये उपचार सुरू होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना दाखल करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची प्रकृती खालावताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

बारामतीहून मुलगा जय पवार याच्यासोबत सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आणि त्यांनी बंगल्यावर पक्षातील बड्या नेत्याची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शरद पवार यांनी या शपथविधीची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट सांगितले. यानंतर पवार कुटुंबातील वाद पुढे आल्याचे बघायला मिळाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *