राष्ट्रवादी विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती?

राष्ट्रवादी विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादी विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती?


राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा सध्या शांत झाला आहे. मात्र, विलिनीकरणासंदर्भात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पूर्वकल्पना होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. टीव्ही नाईनला मिळालेल्या माहितीनुसार, १६ जानेवारीला अजित पवारांच्या मुंबईतील प्रेम कोर्ट निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीत अजित पवार, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. याच बैठकीत अजित दादांनी तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.

विलिनीकरणानंतर शरद पवार राजकारणातून दूर होऊन सामाजिक कार्यात सक्रिय होणार होते, तर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित दादांकडे जाणार होते. सुनील तटकरेंनी मात्र त्यांना विलिनीकरणाची कोणतीही माहिती दिली नसल्याचे आतापर्यंत सांगितले आहे. या दाव्यावर अमोल कोल्हेंनी तटकरे बैठकीत उपस्थित होते असे म्हटले आहे, तर सुप्रिया सुळेंनी दादाच राहिले नाहीत असे म्हणत भावनिक प्रतिक्रिया दिली. दादांच्या निधनानंतर आता दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची विलिनीकरणाची इच्छा दिसत नाही, त्यामुळे विलिनीकरण सध्या तरी होणार नाही, असे म्हटले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *