Headlines

सर्वात मोठ्या युद्धाने खळबळ, 200 ड्रोन, 50 मिसाईल्स डागल्या, जगाची झोप उडाली!

सर्वात मोठ्या युद्धाने खळबळ, 200 ड्रोन, 50 मिसाईल्स डागल्या, जगाची झोप उडाली!
सर्वात मोठ्या युद्धाने खळबळ, 200 ड्रोन, 50 मिसाईल्स डागल्या, जगाची झोप उडाली!


Russia Attack Ukraine : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालूच आहे. हे युद्ध अजूनही थांबलेले नाही. येत्या 25 फेब्रुवार रोजी या युद्धाला चार वर्षे पूर्ण होतील. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धाबाबत तोडगा काढण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु तरीदेखील सर्वमान्य असा तोडगा निघालेला नाही. असे असतानाच आता हे युद्ध नव्याने पेटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये युक्रेनमधील अनेक इमारती उद्ध्वस्त झालेल्या आहेत. कडाक्याच थंडीत हे हल्ले झाल्याने तेथील नागरिकांना जगणं मुश्कील झालं आहे. विशेष म्हणजे रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनचे मोठा आर्थिक नुकसान झाल आहे. रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीने हे हल्ले घडवून आणले आहेत.

50 क्षेपणास्त्रे आणि 200 ड्रोनने हल्ला

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडीमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार रशियाने 21 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा रशियावर हल्ले केले. रशियाने युक्रेनवर साधारण 50 क्षेपणास्त्रे आणि 200 ड्रोन डागले आहेत. सकाळी 4 वाजेपासून या हल्ल्यांचा आवाज ऐकायला येत होता. युक्रेनमधील उर्जानिर्मिती केंद्रे तसेच रेल्वेचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा रशियाचा उद्देश होता. या हल्ल्यांमुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या युक्रेनची राजधानी कीव येथील तापमान उणे 10 अंश सेल्सिअस एवढे कमी झालेले आहे. अशा स्थितीत रशियाने युक्रेनवर हे हल्ले घडवले आहेत.

चार लहान मुलांसह अनेकजण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार रशियाच्या या हल्ल्यामध्ये युक्रेनमधील 23 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या महिला पोलिसाचे नाव विक्टोरिया शपिल्का असे आहे. या हल्ल्यांमध्ये एकूण चार मुलांसह अनेक लोक जखमी झाले आहेत. रशियाने या हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनीयन सैन्य ज्या ठिकाणांचा उपयोग करत होते, त्याच ठिकाणांना आम्ही लक्ष्य केलं आहे, असं रशियाने सांगितले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर युक्रेनचे सैन्य अलर्ट मोडवर आहे. रशियाने केलेल्या या हल्ल्याला युक्रेन जशास तसे उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *