तब्बल 5 शिक्षक बनले हैवान, 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेतच तोडले लचके; हादरवून टाकणारी घटना समोर!

तब्बल 5 शिक्षक बनले हैवान, 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेतच तोडले लचके; हादरवून टाकणारी घटना समोर!
तब्बल 5 शिक्षक बनले हैवान, 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेतच तोडले लचके; हादरवून टाकणारी घटना समोर!


शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना ओडिशातून समोर आली आहे. केंद्रपाडा जिल्ह्यातील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सातवीच्या शिकणाऱ्या या विद्यार्थिनीवर 5 शिक्षकांनी वर्षभर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आता आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात अल्पवयीन पीडितेने आईला याबाबत माहिती दिली, त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या नंतर मुलीच्या कुटुंबाने 18 फेब्रुवारी रोजी बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) कडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

18 फेब्रुवारी रोजी बाल कल्याण समितीला तक्रार मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, सीडब्ल्यूसीच्या पथकाने शाळेला भेट दिली आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली. हे एक संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आता आरोपी शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस काय म्हणाले?

या घटनेबाबत बोलताना केंद्रपाडा पोलिस अधीक्षक सिद्धार्थ कटारिया यांनी म्हटले की, ‘पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे आणि एफआयआरमध्ये नाव असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही एक संवेदनशील बाब आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक या तपासावर लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे आता आरोपींची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

एक वर्षापासून बलात्कार

पीडित मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की, विद्यार्थिनीवर तब्बल एका वर्षापासून वारंवार बलात्कार करण्यात आला. एका महिला शिक्षिकेसह इतर काही शिक्षक आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते अशी माहितीही समोर आली आहे. तसेच या घटनेतील आरोपींना विद्यार्थिनीला या घटनेबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकीही दिली असल्याचेही समोर आले आहे.

शाळा प्रशासनाने काय म्हटले?

पीडित मुलीच्या कुटुंबाने म्हटले की, आम्ही शाळेच्या प्रशासनाला या घटनेची माहिती दिली होती, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, ‘कुटुंबाने केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे तक्रार केल्यानंतरच आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. आता सविस्तर चौकशीनंतरच संपूर्ण सत्य समोर येईल.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *