
काही वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीमध्ये जवळच्या व्यक्तीला लग्नात किंवा एखाद्या शूभ कार्याच्या वेळी सोने हे भेट म्हणून दिले जात असे. पण आजकाल वाढलेले सोन्याचे भाव पाहून क्वचितचजण सोने भेट म्हणून देत असतील.
गेल्या वर्षीपासून सोन्याचे भाव हे सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हे सोने खरेदी करताना 10 वेळा विचार करावा लागत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा…
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजारांची वाढ झाली आहे.
आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 62 हजार 946 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीचे दर 2 लाख 80 हजार 160 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर हे सतत वाढत असल्याचे दिसत आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)