Mumbai | अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

Mumbai | अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
Mumbai | अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या आकस्मिक जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून विमान अपघाताबाबत विविध प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथील वरळीच्या डोममध्ये ही शोकसभा पार पडणार आहे. या शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, विविध पक्षांचे राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून अजित पवार यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *