भारतात पंतप्रधान मोदींनंतर सर्वात जास्त सुरक्षित कोण? नाव आणि पद जाणून व्हाल थक्क

भारतात पंतप्रधान मोदींनंतर सर्वात जास्त सुरक्षित कोण? नाव आणि पद जाणून व्हाल थक्क
भारतात पंतप्रधान मोदींनंतर सर्वात जास्त सुरक्षित कोण? नाव आणि पद जाणून व्हाल थक्क


भारतात अनेकांना सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात येते. क्रेंद्र आणि राज्यातील नेते आणि दिग्गज व्यक्तींना देखील सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात येते. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोणाला अधिक सुरक्षा देण्यात येते आसा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. आपल्या भारतात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात सुरक्षित आहे. तर त्यांच्यानंतर कोणाला तगडी सुरक्षा मिळते? त्या व्यक्तीचं पद आणि नाव ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.. सांगायचं झालं तर, भारतात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एसीजी सेक्युरिटी आहे. सध्या पंतप्रधान मोदींशिवाय इतर कोणाकडेही ही सुरक्षा व्यवस्था नाही. पण पंतप्रधानांनंतर सर्वात मजबूत सुरक्षा व्यवस्था कोणाकडे आहे? याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील सर्वात कडक सुरक्षा प्रदान करण्यात येते… याचा अर्थ असा की सुरक्षेच्या बाबतीत देशात कोणीही पंतप्रधान मोदींपेक्षा वरचढ नाही. पूर्वी अशीच सुरक्षा व्यवस्था पंतप्रधानांच्या कुटुंबियांना देखील प्रदान करण्यात येत होती. पण आती ही सुरक्षा व्यवस्था फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदी यांच्यासाठी काम करते.

पण पंतप्रधान मोदींनंतर भारतात सर्वात सुरक्षित कोण आहे? म्हणजेच, पंतप्रधानांनंतर कोणत्या नेत्याला सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था आहे? असा प्रश्न समोर आल्यानंतर, तुमच्या डोक्यात गांधी कुटुंबियांचं किंवा राहुल गांधी याचं नाव आलं असेल. पण असं नाही… या यादीमध्ये राहुल गांधी यांचं नाव नाही.

नेत्याचं पद आणि नाव

देशात पंतप्रधान यांच्यानंतर सर्वात जास्त सुरक्षा गृहमंत्रांना दिली जाते. म्हणजे, देशात मोदी यांच्यानंतर अमित शहा सर्वात जास्त सुरक्षित व्यक्ती आहेत. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अमित शाह यांना झेड प्लस सुरक्षा मिळते, जी पंतप्रधान वगळता सर्वोच्च पातळीची सुरक्षा आहे. त्यांना एनएसजी कमांडो सुरक्षा देतात.

याशिवाय, सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या विशेष तुकड्या देखील सुरक्षा वर्तुळात सामील आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाया आणि कायदा आणि सुव्यवस्थेत सहभागी असल्यामुळे हे पद उच्च-जोखीम श्रेणीत येते. सांगायचं झालं तर, सुरक्षा कवच गुप्तचर माहिती आणि धोक्याच्या मूल्यांकनाच्या आधारावर ठरवलं जातं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *