काळंबेरं झाल्यास सरकार अडचणीत! रोहित पवारांचा पुन्हा इशारा

काळंबेरं झाल्यास सरकार अडचणीत! रोहित पवारांचा पुन्हा इशारा
काळंबेरं झाल्यास सरकार अडचणीत! रोहित पवारांचा पुन्हा इशारा


अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आगामी प्राथमिक अहवालावरून आमदार रोहित पवारांनी महाराष्ट्र सरकारला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत हा अहवाल येणे अपेक्षित असून, जर त्यात ‘काळंबेरं’ किंवा कोणतीही छेडछाड आढळली, तर त्यांच्याकडे असलेली उर्वरित 70 टक्के माहिती सार्वजनिक करण्याची धमकी रोहित पवारांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत केवळ 20-30 टक्के माहितीच समोर आली आहे.

ब्लॅक बॉक्सचा फोटो आपल्याकडे असल्याचा दावा करत, अपघाताच्या तपासात संशय निर्माण झाल्याचे रोहित पवारांनी नमूद केले. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे म्हटले जात असले तरी, तो भाग शाबूत असल्याचा त्यांचा दावा आहे. या घटनेमागील सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नसल्याची भूमिका त्यांनी विधानसभेत शोक प्रस्तावावर बोलताना मांडली. अपघातातील दोषींना तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *