India In Semi Final : भारत टी-20 वर्ल्ड कपमधून थेट बाहेर? धक्कादायक समीकरण समोर!

India In Semi Final : भारत टी-20 वर्ल्ड कपमधून थेट बाहेर? धक्कादायक समीकरण समोर!
India In Semi Final : भारत टी-20 वर्ल्ड कपमधून थेट बाहेर? धक्कादायक समीकरण समोर!


India Semi Final Calculation : सध्या संपूर्ण देशात टी-20 विश्वचषकाची धूम आहे. भारताने यावेळी ट्रॉफी जिंकावी अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. समस्त भारतीयांची अशी इच्छा असली तरीही प्रत्यक्ष स्थिती मात्र फारच चिंताजनक आहे. भारताचा नुकताच दक्षिण आफ्रिकेविरोधात पराभव झाला. त्यानंतर आता भारत या विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला का? भारतीयांच्या ट्रॉफीचे स्वप्न असेच अधुरे राहणार का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर या विश्वचषकात भारतीय संघ नेमका कुठे आहे? भारताचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न खरंच भंग पावले आहे का? हे जाणून घेऊ या…

भारतासोबत काय काय होऊ शकतं?

सर्वप्रथम भारत अजूनही टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर पडलेला नाही. परंतु भारताचा सेमी फायलनपर्यंत पोहोचण्याचा रस्ता मात्र फारच कठीण झाला आहे. वेस्ट इंडीजमुळे भारताची डोकेुखी वाढली आहे. सुपर-8 सामन्यांत भारताने पहिला सामना 76 धावांनी गमावला. दक्षिण आफ्रिकेविरोधातील या पराभवामुळे भारताचे रनरेट -3.800 वर पोहोचले आहे. आपल्या ग्रुपमध्ये टीम इंडिया ही तिसऱ्या स्थानी आहे. भारताच्या वर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन देश आहे. या दोन्ही देशांचे रनटेट अनुक्रमे +5.350 आणि +3.800 आहे. सेमी फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर टीम इंडियाला या दोन्ही संघांना रन रेटच्या बाबतीत मागे टाकावे लागेल.

नेमकं समीकरण काय? वाचा काय काय होऊ शकतं?

भारत आणि झिम्बॉव्वे हे दोन्ही देश आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झाले. तर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही देश आपल्या पहिल्या सामन्यात विजयी झाले. भारताला सेमी फायनलमध्ये जायचे असेल तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांनी आपापले दोन्ही सामने गमवायला हवेत. वेस्ट इंडीजचा भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरोधात दोन सामने होणार आहेत. तर दक्षिण आफ्रिका हा देश वेस्ट इंडीज आणि झिम्बॉम्बे या दोन संघांशी भिडणार आहे.

तर भारतासाठी कठीण परिस्थिती

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने गमावल्यास भारत सेमी फायनलमध्ये जाऊ शकत. वेस्ट इंडीज आपल्या दोन्ही सामन्यांत पराभूत होऊ शकतो. परंतु दक्षिण आफ्रिकेविरोधात असा दावा करणे थोडे कठीण आहे. असे झाल्यास भारताला सेमी फायनलमध्ये स्थान मिळणे थोडे कठीण ठरू शकते. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *