
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसला. मोठ्या प्रमाणात गारपिट झाली, ज्याने शेतकऱ्यांचे रब्बीचे हाताशी आलेले पिक गेले. फक्त राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात पाऊस झाला. यंदा जवळपास वर्षभर पाऊस कोसळताना दिसतोय. ऐन नोव्हेंबर महिन्यातही पाऊस झाला. अचानक पाऊस आणि त्यापूर्वी उकाडा अशी स्थिती राज्यात आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील हवामानात चढउतार बघायला मिळेल. अवकाळीचे संकट राज्यातून दूर गेले. आज उन्हाचा चटका बसण्याची दाट शक्यता आहे. मुंबईमधील वायू प्रदूषण गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा मुद्दा होता. आता मुंबईतील वायू प्रदूषण कमी झाल्याचे येणाऱ्या आकडेवारीवरून दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी 172 वर असलेला मुंबईचा AQI थेट शंभराच्या आसपास; तर उपनगरांमध्ये 100 च्या आत नोंद झाली
मुंबई व आसपासच्या शहरात तर प्रदूषण कमी होताच दादर चौपाटी परिसरात मोठा फरक; आकाशात ढग स्पष्ट दिसू लागले. 24 तारखेला मुंबई व उपनगरात 172 AQI असलेला निर्देशांक आज भायखळा आणि दादर परिसरात 90 ते 120 दरम्यान तर उपनगरात 50 ते 100 AQI ‘मध्यम’ श्रेणीत; आरोग्यावरील धोका तुलनेने कमी.
गावदेवी (64) मध्ये सर्वात स्वच्छ हवा; वांद्रे पश्चिम, ब्रीच कँडी, कुलाबामध्येही समाधानकारक स्थिती. परळ भोईवाडा, चेंबूर, भांडूप पश्चिम, बोरीवली पूर्व येथे AQI 81 ते 86. कालपर्यंत मास्क लावून मॉर्निंग वॉक करणारे आज मुंबईकर मोकळ्या हवेचा आनंद घेताना दिसले. दादर चौपाटी परिसरात प्रदूषणाची पातळी कमी झाल्याने आकाश अधिक स्वच्छ दिसत असून ढग स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत.
पालिकेच्या कारवाईनंतर प्रदूषणात घट; प्रकल्पांना नोटिसा आणि काही कामे थांबवली. हवेची गुणवत्ता कायम राखावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. देशातील नीचांकी तापमानाची नोंद अलवार येथे झाली. अलवार येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाड येथे 11.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील हवामानात सातत्याने मोठा बदल होताना दिसत आहे.