इराणवरील हल्ल्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची जगाचा थरकाप उडवणारी धमकी, थेट म्हटले, उद्ध्वस्त..

इराणवरील हल्ल्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची जगाचा थरकाप उडवणारी धमकी, थेट म्हटले, उद्ध्वस्त..
इराणवरील हल्ल्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची जगाचा थरकाप उडवणारी धमकी, थेट म्हटले, उद्ध्वस्त..


इराणवर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून हा हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर ठार झाला. सरकारी इमारतींना टार्गेट करण्यात आले. इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही आमचे वचन पूर्ण केले. काही वेळापूर्वीच इराणवर हल्ला करण्यात आला. आम्ही इराणच्या सैन्याला उद्धवस्थ करू असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून इराणला सातत्याने हल्ल्याची धमकी दिली जात होती. शेवटी आता मोठा हल्ला हा इराणवर करण्यात आला. इराण आता या हल्ल्याला नक्की कसे उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अमेरिकेचे सैन्य थेट इराणवरील हल्ल्यात मैदानात उतरले. या युद्धाला सुरूवात झाल्याने मोठी खळबळ उडाली. आता नक्की कोणते देश इराणच्या मदतीला धावून येतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणची मिसाईल उद्धवस्थ करून टाकू. अमेरिकेकडून ऑपरेशनला सुरूवात करण्यात आल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. तुम्ही युद्ध सुरू केले आम्ही संपवणार असा थेट इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. इराणच्या राष्ट्रपती भवनावर थेट मोठा हल्ला करण्यात आला. इस्त्रायल आणि अमेरिका एकत्र येऊन हल्ला करत असल्याने इराणमधील स्थिती अधिक गंभीर झाली.

इराणकडूनही प्रतिहल्ल्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अमेरिका इराणला सातत्याने हल्ल्याची धमकी देत होती, त्यावेळीच इराणने म्हटले होेत की, आमच्यावर हल्ला करण्याची हिंमत करू नका. आमच्यावर हल्ला करणाऱ्याचे आम्ही हात कापू आणि जगाच्या नकाशाहून त्या देशाला काढू.

त्यामध्येच अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ला सुरू केला. या हल्ल्यात सरकारी इमारतींना टार्गेट केले जात आहे. शिवाय इराणच्या टॉप कमांडरलाही टार्गेट करून ठार केले जात आहे. काही वेळापूर्वीच हल्ला करण्यास सुरूवात करण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, लोकांची सुरक्षा हे आमचे ध्येय आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *