
Israel-Iran War: मध्य पूर्वेत अखेर युद्ध सुरु झाले आहे. परंतू या युद्धाच्या सर्वाधिक झळा आता जगाच्या अर्थव्यवस्थांना बसणार आहेत. इस्राईल आणि अमेरिकेचा इराणवर हल्ला झाल्यानंतर परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. तेहराणवर धमाके झाल्यानंतर अनिश्चितेचे वातावरण आहे. या युद्धाचे सर्वात मोठे नुकसान इंधनांवर अवलंबून असलेले देशांवर होणार आहे. आतापासून तेलाच्या किंमती प्रचंड वाढणार आहे. इराण हा भारताला रुपयामध्ये इंधन पुरवणारा एकमेव देश आहे. त्यामुळे भारत आणि चीनसह युरोप देशांची अवस्था बिकट होऊन त्यांच्या अर्थव्यवस्थांना ही धक्का बसणार आहे.
मध्य पूर्वेत वाढता तणाव आणि आता थेट युद्धच सुरु झाल्याने याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. इस्राईल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती आणखीनच गंभीर होणार आहे. तेहराणमधील स्फोटांच्या बातम्यांनी भिती आणि अनिश्चितेचा माहोल निर्माण झाला आहे. या हल्ल्याचा परिणाम इंधनावर होणार आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल लाख महाग होऊ शकते. भारतासारख्या देशात याचा थेट परिणाम होणार आहे. कारण भारताला ८५ टक्के इंधन आयात करावे लागते.
जगाचा तेल पुरवठा प्रभावित
खासकरुन भारतासारख्या देशात याचा थेट परिणाम होणार आहे याचे कारण म्हणजे एक महत्वाचा समुद्री मार्ग आहे. ज्यास स्ट्रेट ऑफ हॉरमुज म्हटले जाते. जर इराणने यास बंद केले तर संपूर्ण जगाचा तेल पुरवठा प्रभावित होऊ शकतो.
स्ट्रेट ऑफ हॉरमुज काय आहे नेमके ?
स्ट्रेट ऑफ हॉरमुज हा जगातला सर्वात मोठा आणि महत्वाचा समुद्री मार्ग आहे. हा मार्ग इराण, ओमान आणि युएईच्या दरम्यान स्थित आहे. हा मार्ग Persian Gulf ला अरबी समुद्राला जोडतो. हा रस्ता अत्यंत निमुळता आहे. परंतू जगातील सर्वाधिक इंधन याच मार्गाने पुरवले जाते. येथून दर दिवशी २ कोटी बॅरल इंधन याच मार्गाने जाते. हा जगातील इंधनाच्या एकूण विक्रीचा २० टक्के भाग येथून जातो. याशिवाय या मार्गातून गॅस देखील पुरवला जातो.
इराणचे सर्वात मोठे अस्र
जर हा मार्ग इराणने बंद केला तर जगातील २० टक्के इंधन आणि गॅस पुरवठा ठप्प होऊ शकतो. यामुळे इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकतो. भारत, चीन आणि जपान या सारखे मोठे देश जास्त प्रभावित होऊ शकतात. कारण हे देश याच मार्गाने येणाऱ्या इंधन आणि गॅसवर अवलंबून आहेत. भारताचे अर्ध्याहून अधिक इंधन या मार्गाने येते. इराणकडे हा मार्ग रोखण्याचे अनेक प्रकार आहेत. तो समुद्री सुरुंग पेरु शकतो. वेगवान नौका आणि मिसाईलने जहाजांवर हल्ला करु शकतो. याशिवाय छोट्या पाणबुड्या आणि ड्रोन देखील वापरु शकतो.