Rashmika Mandanna : लग्नात रश्मिका मंदानाच्या अंगावर 11 खास दागिने, किंमत वाचून थक्क व्हाल!

Rashmika Mandanna : लग्नात रश्मिका मंदानाच्या अंगावर 11 खास दागिने, किंमत वाचून थक्क व्हाल!
Rashmika Mandanna : लग्नात रश्मिका मंदानाच्या अंगावर 11 खास दागिने, किंमत वाचून थक्क व्हाल!


Rashmika Vijay Marriage : प्रसिद्ध अभिनेता रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 20256 रोजी थाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. रश्मिका आणि विजय या दोघांनीह लग्नात केलेला साज पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. त्यांच्या अंगावरचे दागिने यासह त्यांनी केलेला पेहराव एखाद्या राजा-राणीसारखाच भासत होता. विशेष म्हणजे विवाहाचे स्थळदेखील अतिशय आलिशान पद्धतीने सजवण्यात आले होते. भारताची परंपरा आणि राजेशाही थाट अशी थीम समोर ठेवून विवाहस्थळाची सजावट करण्यात आली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रश्मिकाच्या सौंदर्याची सगळीकडेच चर्चा झाली. तिने परिधान केलेले दागिने नेमके किती रुपयांचे आहेत? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. आता याच दागिन्यांची खरी किंमत नेमकी किती आहे? हे समोर आले आहे.

दहा महिन्यांपासून घडवले जात होते दागिने

मिळालेल्या माहितीनुसार रश्मिका मंदानाने लग्नात खूपच खास दागिने परिधान केले होते. तिचे हे दागिने खास हैदराबाद येथून तयार करण्यात आले होते. हैदराबादमधील एक प्रसिद्ध ज्वेलर्स कंपनी गेल्या 10 महिन्यांपासून हे दागिने तयार करत होती. तिच्या दागिन्यांची डिझाईन ही पारंपरिक दक्षिण भारतीय मंदिरातील कला आणि राजेशाही यांच्यापासून प्रेरित होती. तिच्या अंगावर प्रत्येक दागिना हा काळजीपूर्वक आणि बारिक लक्ष देऊन तयार करण्यात आला होता.

रश्मिकाच्या अंगावर 11 प्रकारचे दागिने

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी परिधान केलेल्या दागिन्यांचे वजन साधारण तीन किलो होते, असे सांगितले जात आहे. रश्मिकांच्या अंगावर एकूण 11 प्रकारचे दागिने होते. यात चोकर, लांब हार, झुमके, माथ्यावरचा दागिना, बांगड्या, कमरपट्टा, पैंजण, नथ, बाजूबंद अशा दागिन्यांचा यात समावेश होता. विजय देवरकोंडानेही हार, कडे, बाजूबंद तसेच इतर सोन्याचे दागिने परिधान केले होते.

दरम्यान, या दोघांनीही आमच्या दागिन्यांची किंमत किती आहे, हे अद्याप कुठेही सांगितलेले नाही. परंतु या दोघांच्याही दागिन्यांची किंमत साधारण 4 ते 7 कोटी रुपये आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच पुढच्या अनेक दिवस रश्मिका-विजयचे हे लग्न चर्चेचा विषय राहणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *