Headlines

Pakistan Holi: पाकिस्तानात होळीचे रंग फिके… हिंदूंसाठी कठोर निर्देश जारी…

Pakistan Holi: पाकिस्तानात होळीचे रंग फिके… हिंदूंसाठी कठोर निर्देश जारी…
Pakistan Holi: पाकिस्तानात होळीचे रंग फिके… हिंदूंसाठी कठोर निर्देश जारी…


Pakistan Holi: इस्रायल – इराणमध्ये सुरु असलेल्या महायुद्धाचे पडसाद आता पाकिस्तानात दिसण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी संयुक्तपणे इराणवर हल्ला केला, हल्लात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर देशातील जनता रस्त्यांवर उतरली असून तेथील वातावरण तणावग्रस्त आहे… इस्रायल – इराणमधील वातावरण पाहता, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी निर्देश जारी केले आहेत. झरदारी यांनी यंदाच्या वर्षी पाकिस्तान येथील नागरिकांना साध्या पद्धतीत होळी साजरी करण्यास सांगितली आहे.

पाकिस्तान हिंदू परिषदेचे प्रमुख संरक्षक डॉ. रमेश कुमार वंकवानी यांनी या आवाहनाला पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं की, सध्या राष्ट्रीय सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे 4 मार्च रोजी होळीसाठी मोठ्या प्रमाणात उत्सव आयोजित केले जाणार नाहीत.

पाकिस्तान हिंदू परिषदेचे प्रमुख संरक्षक डॉ. रमेश यांनी देखील यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘राष्ट्रपती यांनी निर्देश योग्य वेळी जारी केले आहेत आणि हे एक अतिशय जबाबदारीचं पाऊल आहे. राष्ट्रीय तणाव पाहता कोणी होळीचं मोठं आयोजन करु नका… राष्ट्रीय सुरक्षेसाठी गर्दीच्या कार्यक्रमांवर मर्यादा घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे.’

राष्ट्रपतींनी आवाह केल्यानंतर वांकवानी यांनी कठोर निर्देश जारी केले आहेत. या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याचं आवाहन परिषदेने केलं आहे. देशभरातील होळीच्या तयारीचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. समुदाय नेत्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. होळीच्या दिवशी होणाऱ्या सर्व सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी सांगण्यात आहे. शिवाय सर्व नियमांच पालन करण्यास देखील सांगण्यात आलं आहे.

युद्धामुळे पाकिस्तामात ताणावग्रस्त वातावरण…

27 फेब्रुवारी रोजी अमेरिका – इस्रायल या दोन देशांनी इराणवर हल्ला केला. या एयरस्ट्राइक दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणने देखील बदला घेण्याची शपथ घेतली आहे… इराणने इस्रायल आणि शेजारील देशांमधील अमेरिकेच्या तळांवर प्रत्युत्तर दिलं आहे. या जागतिक युद्धाची अपेक्षा असल्याने, पाकिस्तान सुरक्षेबाबत अधिकाधिक सतर्क झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *