
फळे आणि भाज्या कापल्यानंतर त्यांचा रंग बदलणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी स्वयंपाकघरात काम करताना ती अनेकदा डोकेदुखी ठरते. विशेषतः बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काही वेळातच काळी पडतात. पण यामागचे नेमकं कारण काय, तसेच बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काळी पडू नयेत, यासाठी सोपे घरगुती उपाय आज आपण माहिती करुन घेऊया.