
गेल्या काही दिवसांपासून इराण अमेरिका आणि इस्त्रायल विरोधात मोठी कारवाई करत आहे. इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने इस्त्रायलची राजधानी तेहरानवर हल्ला केला. तसेच आणथी 30 महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. त्यानंतर इराणने देखील दोन्ही देशांना प्रतीउत्तर दिले आहे. इराणने आखाती देशांमधील अमेरिकेचे लष्करी बेस उद्धवस्त केले आहेत. एकंदरीत वातावरण पेटलेले असताना इराणला आणखी एका नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे.
इस्त्रायलमध्ये भूकंप
इस्त्रायल आणि इराण युद्ध सुरु असताना इराणवर आणखी मोठे संकट कोसळले आहे. इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणच्या गिराश परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. इराणमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. पण इराणमधील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकेने केली अणू चाचणी?
इराणप्रमाणेच अमेरिकेमध्ये देखील भूकंपाचे हादरे जाणवले. अमेरिकेतील नेवादा अणुचाचणी केंद्रावर हे भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. त्यामुळे अमेरिकेने अणू चाचणी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अमेरिकेचा हाय अलर्ट
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध पेटलेले असतानाच आता अमेरिकेने अत्यंत मोठा हाय अलर्ट जारी केला. सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने मध्य पूर्वेतील 14 देशांतील आपल्या नागरिकांना तातडीने बाहेर पडण्याचा हाय अलर्ट जारी केला. कोणत्याही मार्गाने लवकारत लवकर हे देश सोडण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. अमेरिकेने म्हटले की, मध्य पूर्वेतील गंभीर धोक्यामुळे अमेरिकन नागरिकांनी ताबडतोब आणि लवकरात लवकर व्यावसायिक विमानांनी किंवा मिळेल त्या मार्गाने आखाती देशातून बाहेर पडावे. या देशांच्या यादीमध्ये कुवेत, गाझा, बहरीन, इराण, इजिप्त, यूएई, इस्त्रायल, जॉर्डन, लेबनॉन, इराक, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, येमेन यांचा समावेश आहे.