Headlines

दारू पिताना ही चूक करू शकते आयुष्याचा शेवट, अत्यंत धोकादायक, तज्ज्ञांनी थेट…

दारू पिताना ही चूक करू शकते आयुष्याचा शेवट, अत्यंत धोकादायक, तज्ज्ञांनी थेट…
दारू पिताना ही चूक करू शकते आयुष्याचा शेवट, अत्यंत धोकादायक, तज्ज्ञांनी थेट…


दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र, काही लोक असे आहेत, ज्यांच्या दिवसाची सुरूवातच दारू पिण्याने होते. मात्र, दारू पितांना त्यांच्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही लोक पार्टी असो किंवा एखाद्या कार्यक्रम अशावेळी उपाशीपोटी दारू पितात. उपाशीपोटी दारू पिणे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. हे आरोग्यासाठी जोखिम पूर्ण आहे. डॉक्टरांचे स्पष्ट म्हणणे आहे की, उपाशी पोटी दारू पिण्याइतके आपल्या शरीरासाठी दुसरे काहीही घातक नाही. कधीच उपाशी पोटी दारू पिण्याची चूक करू नका. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही जर उपाशी पोटी दारू पित असाल तर ती दारू शरीरातील लहान आतड्यांमध्ये लगेचच पोहोचते. एक तर तुमच्या पोटात अन्न नाही आणि त्यातच छोटे आतडे अल्कोहोल लवकर शोषून घेतात. याचा वाईट परिणाम असा होतो की, अचानक रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण वाढते.

ज्यामुळे दारू लवकर चढते आणि थेट चक्कर आणि बेशुद्ध होण्याचे प्रमाण वाढते. तज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी दारू पिल्याने आपल्या जठरावरही सूज येण्याची शक्यता अधिक असते. यासोबतच तुमच्या जठराला इजाही होऊ शकते. आपण बऱ्याचदा ऐकले असेल की, अरे तो खूप जास्त दारू प्यायचा आणि आता त्याचे जठरच खराब झाले. कारण उपाशी पोटी दारू पिल्याने जठरला सूज येते आणि दिवसेंदिवस हेच सुरू राहिले तर ते खराब होण्यास सुरूवात होते.

उपाशीपोटी दारू पिल्याने अल्सर आणि पोटदुखीची समस्या निर्माण होते. अनेकदा दारू पिलेल्या व्यक्तीला उलट्या आणि मळमळ होते, त्याचे हे प्रमुख कारण आहे. यामुळे पचनक्रिया कमी होते आणि खाल्लंल अन्नही अजिबात पचत नाही. रिकाम्या पोटी दारू पिल्याने मेंदूतील रक्तप्रवाहावर लवकर परिणाम होतो. याचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो.

हे ब्लॅकआउटचे एक प्रमुख कारण आहे. मुळात म्हणजे दारू पिणे हेच आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामध्येच उपाशी पोटी दारू पिल्याने अनेक गंभीर आरोग्य समस्या या निर्माण होतात. यकृत तज्ञ सांगतात की, जर कोणी दारू रिकाम्यापोटी पिली तर त्याचा भयंकर वाईट परिणाम हा आपल्या यकृतावर होतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *