ती मेली… 17 मिनिटानंतर पुन्हा जिवंत झाली! तरुणीचा थरारक अनुभव; परत आल्यावर सांगितलं ‘त्या’ क्षणांचं गूढ

ती मेली… 17 मिनिटानंतर पुन्हा जिवंत झाली! तरुणीचा थरारक अनुभव; परत आल्यावर सांगितलं ‘त्या’ क्षणांचं गूढ
ती मेली… 17 मिनिटानंतर पुन्हा जिवंत झाली! तरुणीचा थरारक अनुभव; परत आल्यावर सांगितलं ‘त्या’ क्षणांचं गूढ


सोशल मीडियावर सध्या एका महिलेची थरारक कहाणी प्रचंड चर्चेत आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर जाऊन पुन्हा जीवनात परत आल्याचा तिचा दावा अनेकांना आश्चर्यचकित करत आहे. ब्रिटनमधील ग्लॉस्टर येथे राहणारी व्हिक्टोरिया थॉमस हिने वयाच्या 35व्या वर्षी जिममधील बूटकॅम्प क्लासदरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागल्याचे सांगितले. तिला चक्कर आणि तीव्र थकवा जाणवू लागला. ती म्हणाली की, मी माझ्या ट्रेनरला सांगितले की, मला बरं वाटत नाही. आणि काही क्षणातच मी जमिनीवर कोसळले.” त्या क्षणी तिचे हृदय थांबले होते. तिला कार्डिअॅक अरेस्ट आला होता. पॅरामेडिक्सने सुमारे 17 मिनिटे सीपीआर दिले, पण सुरुवातीला तिची नाडी सापडत नव्हती. डॉक्टरांच्या तपासणीनंतर ती मृत असल्याचे सांगितले गेले होते. मात्र त्यानंतर अनपेक्षितरीत्या तिच्या हृदयाची धडधड पुन्हा सुरू झाली.

17 मिनिटांत नेमकं काय घडलं?

व्हिक्टोरिया थॉमस हिचं हृदय तब्बल 17 मिनिटांनंतर पुन्हा धडधडू लागलं. तिने द मिरर आणि एलएडीबायबल यांना दिलेल्या मुलाखतीत त्या क्षणांविषयी सांगितले. सगळीकडे काळोख दाटला होता. काहीच दिसत नव्हतं. मग अचानक मला जाणवलं की, मी जिमच्या छताजवळ तरंगत आहे. खाली माझं स्वतःचं शरीर पडलेलं दिसत होतं. आजूबाजूला लोकांची धावपळ आणि पिवळ्या रंगाची यंत्रं होती. मी स्वतःलाच वरून पाहत होते. तिने पुढे सांगितलं की, त्या वेळी तिला भीती वाटली नाही. कोणतीही प्रकाशरेषा दिसली नाही, शांततेचा विशेष अनुभवही आला नाही. फक्त वरून संपूर्ण प्रसंग पाहत असल्यासारखं जाणवत होतं, असं व्हिक्टोरिया म्हणाली.

हृदय प्रत्यारोपणानंतर नवजीवन मिळाले

मृत्यूच्या उंबरठ्यावर जाऊन परत आल्याचा अनुभव अनेकजण सांगतात. वैद्यकीय भाषेत याला आउट-ऑफ-बॉडी एक्सपीरियन्स (OBE) किंवा नियर-डेथ एक्सपीरियन्स (NDE) असे म्हटले जाते. व्हिक्टोरिया थॉमस हिचा अनुभवही असाच होता. मात्र तिने सांगितले की हा अनुभव शांत किंवा सुखद नव्हता. उलट तो भीतीदायक आणि विचित्र होता जणू ती एखाद्या वेगळ्याच जगात गेली होती. नंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता तिला डॅनॉन रोग हा अतिशय दुर्मिळ अनुवंशिक आजार असल्याचे समोर आले.

हा आजार हृदय, स्नायू आणि यकृतावर परिणाम करतो. जगभरात दशलक्षामागे एकापेक्षाही कमी लोक या आजाराने ग्रस्त असतात. या आजारामुळे तिचे हृदय वारंवार निकामी होत होते. अनेक वेळा हार्ट फेल्युअरचा सामना केल्यानंतर तिने शेवटी हृदय प्रत्यारोपण करून घेतले. सध्या ती पूर्णपणे निरोगी आहे. ती एका निरोगी मुलाची आई आहे आणि पुन्हा फिटनेसकडे वळत नवे आयुष्य जगत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *