Thackeray Brothers | ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद

Thackeray Brothers | ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
Thackeray Brothers | ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद


ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील नाराजी अखेर दूर झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने ठाकरे गटासोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेने प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची मागणी केली होती. या मागणीला मान्यता देत दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आहे. त्यानुसार नॉर्थ प्रभाग समितीचे अध्यक्षपद दोन वर्षांसाठी मनसेकडे राहणार आहे. तसेच एसएनटी प्रभाग समितीचे अध्यक्षपद एक वर्षासाठी मनसेला देण्यात येणार आहे. एफ साऊथ प्रभाग समितीतही एक वर्ष अध्यक्षपद मनसेकडे असेल.
याशिवाय पी तसेच पूर्व आणि पश्चिम प्रभागांमध्ये प्रत्येकी एक वर्ष मनसे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी असणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव कमी झाल्याचे मानले जात असून, आगामी प्रभाग समिती निवडणुकांमध्ये एकत्रित लढत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या समझोत्यामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होत असल्याचे दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *