Headlines

IND vs ENG, Semi Final: खेळपट्टीवरून गौतम गंभीरने क्युरेटरला फटकारले! व्हायरल फोटोवरून चर्चा

IND vs ENG, Semi Final: खेळपट्टीवरून गौतम गंभीरने क्युरेटरला फटकारले! व्हायरल फोटोवरून चर्चा
IND vs ENG, Semi Final: खेळपट्टीवरून गौतम गंभीरने क्युरेटरला फटकारले! व्हायरल फोटोवरून चर्चा


IND vs ENG, Semi Final: खेळपट्टीवरून गौतम गंभीरने क्युरेटरला फटकारले! व्हायरल फोटोवरून चर्चाImage Credit source: PTI

टी20 वर्ल्डकप उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि इंग्लंड आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला घरच्या प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने भारतीय प्रेक्षकांना गप्प करू अशी वल्गना केली आहे. एकीकडे शा‍ब्दिक चकमक रंगली आहे. दुसरीकडे, वानखेडेच्या खेळपट्टीवर चिंतेचं वातावरण आहे. वानखेडेची खेळपट्टी कायम फलंदाजांना मदत करणारी राहिली आहे. पण गौतम गंभीरने खेळपट्टीचा अभ्यास केल्यानंतर चिंता वाढली असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. खेळपट्टीचा पहिला फोटो समोर आला आहे. त्यामुळे वादाला सुरूवात झाल्याचं बोललं जात आहे. व्हायरल फोटोनुसार, वानखेडेच्या खेळपट्टीवर हिरव्या गवताचा थर दिसत आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते. त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा मोठा वाटा असण्याची शक्यता आहे. पावर प्लेच्या षटकात वेगवान गोलंदाज सामन्याची लय बिघवडू शकतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक फोटोमध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खेळपट्टीच्या क्यूरेटरशी चर्चा करताना दिसत आहे. यावेळी गौतम गंभीर संतापलेल्या दिसला. या खेळपट्टीवर गौतम गंभीर नाराज असल्याचं दिसून आलं. भारतीय संघाने 3 मार्चला वानखेडे स्टेडियममध्ये सराव केला. या सरावदरम्यान गौतम गंभीरने खेळपट्टीचं निरीक्षण केलं. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडचा पेपर कठीण जाण्याची शक्यता ठआहे. गवताळ पृष्ठभाग असल्याने त्याचा फायदा वेगवान गोलंदाजांना होईल. त्यामुळे पावरप्लेमध्ये धावा करणं कठीण जाऊ शकतं.

दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेत सध्याच्या संघातील अनेक खेळाडू खेळले आहेत. त्यामुळे त्यांना भारतीय खेळपट्ट्यांचा चांगला अंदाज आहे. अशा स्थितीत इंग्लंडचं तगडं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. खेळपट्टीचा अंदाज घेऊन भारतीय संघ प्लेइंग 11 ठरवेल. कदाचित अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात असलेल्या खेळपट्टीसारखीच ही खेळपट्टी असू शकते. त्यामुळे भारतीय संघाला फलंदाजीत खोली ठेवावी लागेल. तसेच प्रथम फलंदाजी आली तर मोठी धावसंख्या करण्याचं आव्हान असणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *